पिंपरी-चिंचवड । मराठा आरक्षणाबाबत महाविकासआघाडीने मराठा समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याची बोचरी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाकडून दिव्यांग व्यक्तींना साहित्य वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमानंतर चंद्रकांत पाटील माध्यमांशी बोलत होते.
यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, काँग्रेसच्या अनेक नेत्यांना मराठा आरक्षण कधी मान्यच नव्हतं. मान्य होतं, तर १५ वर्षे देशात आणि राज्यात त्यांचं सरकार होत. मग मराठा समाजला आरक्षण का दिलं नाही? आताही सर्वोच्च न्यायालयात केस व्यवस्थित चालवली नाही. मोठमोठे वकील देऊन काही होत नाही. उच्च न्यायालयात ९० दिवस केस चालली, ९० दिवस संध्याकाळी ३ तास प्रतिकोर्ट भरवायचो. काय चुकलं, उद्या काय मांडायचं अशी आम्ही ९० दिवस तयारी केली. मात्र, यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या तारखेच्या अगोदर कोणी मंत्री गेले नसल्याचा आरोप त्यांनी केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीत बसून व्हिडिओ कॉन्फरन्सिंग केली नाही. वकीलही दिशाहीन होते. तर, मराठा मागास कसा? हे मागास आयोगाने सत्तावीसशे पाहणी रिपोर्टमध्ये दिलेलं आहे. हे दाखवलं असत तरी सर्वोच्च न्यायालय राजी झालं असतं असं देखील पाटील म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या ला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.