महिला जिल्हाधिकाऱ्याने भाजप नेत्याच्या कानशीलात लगावली; पहा व्हिडीओ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत देशभरात निदर्शने सुरू आहेत. याच्या समर्थनार्थ अनेक ठिकाणी निदर्शनेही केली जात आहेत. मध्य प्रदेशच्या राजगडमध्ये सीएएच्या समर्थनार्थ निदर्शने करताना एका आंदोलनकर्त्याने उपजिल्हाधिकारी प्रिया वर्मा यांचे केस खेचले.प्रशासन आंदोलकांना रोखण्यासाठी आणि आंदोलकांना रस्त्याच्या मधोमधुन हटविण्याचा प्रयत्न करीत होते. दरम्यान, उपजिल्हाधिकारी प्रिया वर्मा यांनी भाजप नेत्याला कानशिलात लगावली. त्यानंतर एका आंदोलकाने उपजिल्हाधिकारी प्रिया वर्मा यांचे केस खेचले.

 

या घटनेवर माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी कमलनाथ सरकारवर टीका केली आहे. ते एका ट्विटमध्ये म्हणाले, आजचा दिवस लोकशाहीच्या काळ्या दिवसात मोजला जाईल. आज राजगडमधील उपजिल्हाधिकारी साहिबा यांनी सीएएच्या समर्थनार्थ निदर्शने करणाऱ्या कार्यकर्त्यांना मारले, ओढले आणि फटकारले. या निर्लज्जपणाचा मी निषेध करू शकत नाही. त्यांना निदर्शकांना मारहाण करण्याचे आदेश मिळाले काय?

देशभरात नागरिकता दुरुस्ती कायद्याच्या निषेधाच्या वेळी मध्य प्रदेश सरकारने हे कायद्याला विरोध करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. याचा निषेध म्हणून मुख्यमंत्री कमलनाथ आणि सर्व मंत्री व कॉंग्रेस कार्यकर्त्यांनीही पदयात्रा काढला आहे.

हे पण वाचा –

उझबेकिस्तानमध्ये बसून ‘ती’ मुंबईत चालवायची SEX रेकेट; ८० हजार रेट!

लज्जास्पद! नांदेडमध्ये शिक्षकांनीच केला सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर बलात्कार

केरळमध्ये मशिदीत पार पडला हिंदू विवाह सोहळा; मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

भाजप सेनेच्या आमदारांची सभागृहातच हाणामारी; जयंत पाटील, फडणवीस धावले मदतीला

मालिकेत न्यूड सीन दिल्यानं ‘या’ टीव्ही अ‍ॅक्ट्रेसचा तुटला होता साखरपुडा