महिला डीजीटल साक्षरता कार्यशाळा संपन्न;राज्य महिला आयोगाचे आयोजन  

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे

माहिती तंत्रज्ञान युगात जग प्रगती करत आहे. पण ग्रामीण महिला जीवन सुकर करणाऱ्या इंटरनेट पासून दूर आहे. या महिलांना तंत्रज्ञानाची माहीती व्हावी आणि त्यांना डीजीटल साक्षर व्हाव्यात यासाठी गुरुवार दि. १२ डिसेंबर रोजी पाथरी येथे राज्य महिला आयोग आणि जनवादी ग्रामविकास प्रतिष्ठान यांच्या वतीने एकदिवशीय डिजीटल प्रशिक्षिण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी प्रविण प्रशिक्षक पल्लवी चींचवडे यांनी विविध शासकीय ऍप बद्दलची माहिती उपस्थित महिलांना दिली. कार्यक्रमाचे उदघाटन पंचायत समिती सभापती राजेश ढगे यांनी केले. यावेळी जि.प. सदस्य कुंडलीकराव सोगे, उपसभापती रमेश तांगडे. राज्य महिला आयोगाच्या जिल्हाध्यक्षा वनिता चव्हाण, मंगलताई गायकवाड, राधाकिशन डूकरे यांची प्रमुख उपस्थिती होती .

या कार्यशाळेत तालुक्यातील ११० महीलांनी उपस्थित दर्शवत डिजीटल प्रशिक्षण घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जनवादी ग्रामविकास प्रतिष्ठाणचे अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांनी तर सुत्रसंचलन अविनाश मगर यांनी केले. यावेळी आभार प्रदर्शन नंदाताई गायकवाड यांनी केले. कार्यशाळा यशस्वीतेसाठी प्रतिभा अंभोरे,उषा उजगरे,रेखा मनेरे पुजा भदरगे यांनी परिश्रम घेतले.

Leave a Comment