‘बोल्ड’नेसच्या सर्व सीमा पार, ‘रागिनी MMS रिटर्न-2’ चा ट्रेलर लॉन्च…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

चंदेरी दुनिया । ‘रागिनी एमएमएस रिटर्न 2’चा या वेबसीरिजचा ट्रेलर शुक्रवारी लॉन्च झाला. सस्पेन्स, अॅक्शन, थ्रिल, बोल्डनेस आणि हॉररचा तडका असणारा हा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. बोल्डनेसच्या सीमा पार केलेला हा ट्रेलर पाहण्यासाठी नेटकऱ्यांच्या उड्या पडल्या आहेत.

 

 

ट्रेलर लॉन्च झाल्यापासून आतापर्यंत 6 लाखांपेक्षा जास्त लोकांनी तो पाहिला असून हा आकडा वाढतच आहे. ‘रागिनी एमएमएस रिटर्न 2’ ही वेबसीरिज 18 डिसेंबरला ‘ऑल्ट बालाजी’ आणि ‘झी-5’वर प्रदर्शित होणार आहे. या वेबसीरिजमध्ये सनी लिओनी, दिव्या अग्रवाल आणि वरुण सूद यांची प्रमुख भूमिका आहे. ट्रेलर लॉन्चपूर्वी वेबसीरिजचे एक गाणेही लॉन्च करण्यात आले होते. या गाण्यात सनी लिओनी डान्स करताना दिसत आहे. ‘हॅलो जी’ असे बोल असणारे हे गाणे देखील लोकांना आवडले आहे.

 

 

ट्रेलरमध्ये रागिनी श्रॉफ (शेवटच्या वर्षाची विद्यार्थिनी)च्या आयुष्याची झलक दाखवण्यात येते. ही भूमिका दिव्या अग्रवाल साकारत असून ट्रेलरमध्ये तिचा अभिनय दमदार दिसत आहे. रागिनी आपली मैत्रिण वर्षासाठी एक बॅचलर पार्टीचे आयोजन करते. मुलींची ही गँग बॅचलर पार्टीसाठी एका ट्रिपवर जाते, ज्या ठिकाणी मुलांचा एक ग्रुप आधीपासून उपस्थित असतो. हॉटेलमध्ये पार्टीपासून कथेला सुरुवात होते. अभिनेता वरूण सूद या हॉटेलचा मालक दाखवण्यात आला आहे. बोल्ड, थ्रिलर आणि हॉरर अशी ही वेबसीरिज हिट होईल यात शंकाच नाही.

 

ट्रेलर पाहण्यासाठी क्लिक करा – https://www.youtube.com/watch?v=qlSN1LngNoM

Leave a Comment