बुलडाणा प्रतिनिधी | राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी बुलडाणा दौर्यावर असताना एका शेतकर्यांने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पुन्हा आणू भाजपचे सरकार असं लिहीलेला टीशर्ट घालून शेतकर्यांने आत्महत्या केल्याने याची जोरदार चर्चा सुरु आहे.
सदर घटना कामगार मंत्री डॉ संजय कुटे यांच्या मतदार संघात घटली आहे. शेगाव तालुक्यातील खातखेड येथे सकाळी ११ वाजता सदर शेतकर्याने आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. राजू ज्ञानदेव तलवारे (वय३५) असं मृत शेतकर्याचे नाव असून कर्जबाजारी पणा मुळे त्याने आत्महत्या केल्याची चर्चा आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जळगाव जामोद मतदार संघात सभा होण्यापूर्वी ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. राज्याचा मुख्यमंत्री जिल्ह्यात आलेला असताना शेतकर्यांनं आत्महत्या करणे लाजिरवाने असून शेतकर्यांवर आत्महत्या करण्याची वेळ का येते याचा विचार होणे गरजेचे आहे.