मुंबई सोडताना कंगणाने पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचले ; मुंबई बद्दल केलं ‘हे’ वक्तव्य

0
35
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे प्रचंड चर्चेत आहे. त्यातच मुंबई ही मला पाकव्याप्त काश्मीर सारखी का वाटतेय अस म्हणून तिने मुंबईची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने कंगनाच्या अनधिकृत कार्यालयावर मुंबई महापालिकेने कारवाई केली होती. त्यानंतर आपल्या कार्यालयात झालेलं नुकसान पाहण्यासाठी मुंबईत आलेली कंगना आता चार दिवसानंतर पुन्हा एकदा आपल्या गावी मनाली येथे जात आहे. त्यातच मुंबई सोडताना मुंबई बद्दल वक्तव्य करत कंगनाने पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

“मी अत्यंत जड अंत:करणानं मुंबईचा निरोप घेत आहे. माझी निंदा नालस्ती केली गेली, ऑफिसपाठोपाठ माझं घर तोडण्याचा प्रयत्न झाला. सुरक्षारक्षकांचा पहारा माझ्याभोवती ठेवावा लागला. ज्याप्रकारे मला दहशत दाखवण्यात आली ते बघता पाकव्याप्त काश्मीरची तुलना वर्मी लागली असंच म्हणावं लागेल.” मुंबई सोडताना कंगनाने अस ट्विट केलं आहे. या ट्विटद्वारे तिने पुन्हा एकदा आपल्या टीकाकारांवर निशाणा साधला आहे. तिचं हे ट्विट सध्या वायरल झालं आहे.

गेल्या काही दिवसांपासून कंगना रणौत सातत्याने महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांविरोधात वादग्रस्त वक्तव्य करत आहे. ‘मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटतेय?’ या वक्तव्यानंतर अनेकांना कंगनाला मुंबईत न येण्याची ताकीद दिली होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’ 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here