मोदी-शहांची पण चौकशी झाली पाहिजे – खा. संजय राऊत

0
42
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम, HELLO महाराष्ट्र | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) नोटीस पाठवून चौकशी करण्यात आली होती. या संपूर्ण घटनेबाबत खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया आज दिली. राज ठाकरे यांची ईडीने केलेल्या चौकशीबाबत आपल्याला काही खास वाटत नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

आपण याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिलं पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. तसंच उद्या जर नरेंद्र मोदींवर आरोप झाले तर त्यांचीही चौकशी झाली पाहिजे असं सांगत संजय राऊत यांनी ईडीच्या कारवाईचं समर्थन केलं आहे. “ईडी, सीबीआय, आयकर विभाग आपापल्या पद्धतीने काम करत असतात. अनेक राजकारणी उद्योग क्षेत्रात आहेत. हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे. मात्र कारवाईकडे राजकीय दृष्टीनं पाहणं आणि बोलणं योग्य नाही. जर उद्या मी काही चुकीचं केल नसेल तर सिद्ध करु शकतो. पुराव्याला देशात अजूनही स्थान असून लोकशाही जिवंत आहे”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

“आपल्या तपास यंत्रणांवर चांगले संस्कार आहेत. उद्या माझ्यावर असे काही आरोप झाले, तर माझीही चौकशी झाली पाहिजे नरेंद्र मोदींचीही चौकशी झाली पाहिजे, अमित शाह, राहुल गांधी किंवा सोनिया गांधी कोणीही असो सर्वांची चौकशी झाली पाहिजे”, असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here