कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांची आज सातारा येथे प्रचार सभा पार पडली. उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ आलेल्या मोदी यांनी यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीवर कडाडून टीका केलीय. मात्र आता राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मोदी, शहा यांच्या प्रचार सभांचा चागला परिणाम होत असल्याचं म्हणालेत.
पंतप्रधान नरेंन्द्र मोदी आणि अमित शहा जितक्या सभा घेतील तितके लोकांना कळेल की यांच्याकडे बोलायला काहीच नाही असं चव्हाण यांनी म्हटलंय. भाजप ३७० कलमावरुन प्रचार करत आहे. त्यांना लोकांच्या पोटापाण्याचं, शेतकर्यांच्या आत्महत्यांचं, बेरोजगारीचं काहीच पडलेलं नाही असं म्हणत चव्हाण यांनी भाजपवर टीका केलीय.
तसेच इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले. तो खरा राष्ट्रवाद आहे असं म्हणत मोदींच्या राष्ट्रवादावर चव्हाण यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. यांच्यातील कोणी कधी तरुंग तरी पाहिला आहे काय? आणि हे आम्हाला राष्ट्रवाद शिकवत आहेत असं सांगत चव्हाण यांनी आता यांच्याच सभांमधून जनता शहाणी होईल असं म्हटलंय.