यवतमाळ प्रतिनिधी। यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील बोरी अरब येथून जवळच असलेल्या बोद गव्हाण येथील जि. प. शाळेची इमारत व व्हरांडा जीर्ण झालेला असून वर्ग खोल्यांच्या आतील छताचे तुकडे खाली पडत आहेत. त्यातच पावसाळा अजून असून छतातून पाणी गळत असल्यामुळे विद्यार्थाना शाळेच्या बाहेर बसून किंवा वर्गात बसून आपला जीव मुठीत धरून शिक्षण घ्यावं लागतं आहे. त्यामुळं पालकांनी उपोषणाचा आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत आहेत. बोधगव्हाण येथील शाळेची इमारत पंचायत समिती दारव्हा अंतर्गत येते.
सध्या शाळेच्या जीर्ण झालेल्या इमारतीमुळे विद्यार्थी-शिक्षकांवर कधीही दुर्घटना घडण्यचे सावट आहे. या सर्व परिस्थितीबाबत प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचे विद्यार्थ्यांचे पालक सांगता आहेत. शाळेच्या या दुरवस्थेमुळे वर्ग खोल्यात पावसाळ्यात पाणी गळत असल्यामुलळे छत पडून काही अनर्थ घडेल की काय अशी चिंता पालकांच्या जीवाला घोर लागला आहे.
त्यामुळं ते आपल्या मुलांना शाळेत जीव मुठीत धरून पाठवत आहेत. याबाबत पालकांनी प. स. दारव्हा, जि. प. यवतमाळ किंवा गट ग्रामपंचायत पांढूर्ना यांच याकड संपूर्ण दुर्लक्ष असलेलं दिसून येत आहे. पालकांनी तीनही स्तरावर निवेदन देऊनही प्रशासनान याकडे दुर्लक्ष केल्यान विद्यार्थी व पालकांच्या पदरी नैराश्यच लागले आहे. परंतु आज गावकऱ्यांच्या सहनशीलतेचा बांध फुटून वरिष्ठ स्तरावरून शाळेची दुरुस्ती केली नाही. तर उपोषण करून शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. तेव्हा आता जि. प. प्रशासन याबाबत पाऊल उचलणार का हा सवाल अजून तरी अनुत्तरित आहे.