‘या’ गावात नेत्यांना, अधिकार्‍यांना गावबंदी, देशात बुलेट ट्रेन झाली पण आमच्या गावात रस्ता नाही असा आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी | गोदाकाठच्या लोकांनी थडी उक्कडगाव येथे सात गावातील नागरिकांची महापंचयात आयोजित केली होती. या पंचायतीत सात गावातील शेकडो महिला व पुरुष उपस्थित होते. या महापंचायतीत गोदाकाठच्या गावांनी निवडणुकीवर संपूर्ण बहिष्कार टाकून मतदान न करण्याचे ठरवले आहे. तसेच शासकीय अधिकारी व राजकीय पदाधिकारी यांना गावबंदी करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

गोदाकाठच्या रस्ता दुरुस्तीसाठी सात गावांनी घेतलेल्या महापंचायतीत मतदानावर बहिष्कार व गावबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. सोनपेठ तालुक्यातील गोदावरी काठच्या अकरा गावांचा रस्त्यांचा दळणवळणाचा गंभीर प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित आहे. थोडा पाऊस पडला की सात गावांचा जगाशी असणारा संपर्क तुटतो. त्यामुळे मोठ्या अडचणी निर्माण होतात. नुकत्याच झालेल्या पावसाने गोदाकाठच्या गावांना जोडणारे दोन्हीही रस्ते ठप्प झाल्याने या गावातील विद्यार्थ्यांची शाळा आठ दिवस बंद होती. या गावात झालेल्या प्रतिष्ठित नागरिकांच्या अंत्यसंस्कारासाठी लोकांना जाता आले नाही. गरोदर स्त्रिया व रुग्णांचे मोठे हाल झाले.

याबाबत सोमवारी सोनपेठ येथे प्रशासनाला निवेदन देण्याचे ठरले असून प्रत्येक गावात गावबंदीचा व निवडणूक बहिष्कार बाबत फलक लावण्याचे ठरवण्यात आले. या महापंचायतीस लासीना, थडी उक्कडगाव, वाडी पिंपळगाव, थडी पिंपळगाव, गंगा पिंपरी, लोहिग्राम, गोळेगाव, यासह गोदाकाठच्या गावातील नागरिक सरपंच, उपसरपंच, चेअरमन, माजी सरपंच यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक महिला युवक व शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि विधानसभेच्या बातम्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra

इतर महत्वाच्या बातम्या-