हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । अनेक वेळा रक्तदानाबाबत चुकीचे गैरसमज पसरले गेले आहेत. नियमित पणे रक्तदान केल्याने शरीरासाठी फार फायदा होतो. रक्ताचे वेगवेगळे गट निर्माण केले आहेत. रक्तदानाचा फायदा ज्या पदतीने आपल्याला होतो. त्याच्या किती तरी पटीने हा फायदा हा समोरच्या रुग्णाला होतो. त्यामुळे रक्तदान करणे यासारखे मोठे पुण्य असूच शकत नाही.
एका वेळेस रक्तदान केल्याने शरीरातील ३०० ते ६०० किलो कॅलरी एकाच वेळी कमी होतात. तसेच वजनही कमी होते. त्यामुळे सतत रक्तदान न करता तीन महिन्यातून एकदा रक्त दान करू शकतो. रक्त दान केल्याने आपल्या शरीरातील रक्त जरी कमी होत असले तरी ते भरून निघते. रक्तदान केल्याने शरीराला कोणताही त्रास निर्माण होत नाही. परंतु प्रत्येक वेळी आपल्या पद्धतीने रक्त दान करताना काळजी घेतली पाहिजे.
रक्तदान केल्याने अनेक वेळा तुमच्या शरीरातील आयर्न चे प्रमाण वाढण्यास मदत होते.तुम्ही केलेल्या रक्तदानामुळे इतर तीन ते चार लोकांना ते रक्त कामी येते. तसेच रक्तदान केल्याने कॅन्सर किंवा यकृताचा आजार निर्माण होत नाही त्यामुळे वर्षातून कमीतकमी एकदा तरी रक्तदान करावे . तसेच रक्तदान केल्याने शरीरातील आयर्न चे प्रमाण कॉन्स्टंट राहण्यास मदत होते. त्यामुळे लिव्हर खराब होण्याचा धोका निर्माण होत नाही. तसेच लिव्हर मध्ये जास्त प्रमाणात आयर्न साठले तर लिव्हर टिशुचे ऑक्सिडेशन होते. त्यामुळे लिव्हर खराब होतो. हे प्रमाण अति प्रमाणात झाल्यास कॅन्सर होण्याचा धोका जास्त असतो. रक्तदान केल्याने तुमच्या शरीरातील रक्त भरून निघते तसेच लाला पेशी निर्माण होण्याचे काम सुरु होते. त्यामुळे आरोग्य सुधारते तसेच शारीरिक कार्य अधिक चांगल्या पद्धतीने केले जाते. जर रक्तदान केल्याने कोणाचे आयुष्य सुधारत असेल तर त्याचा परिणाम हा आपल्या मनावर तसेच शरीरावर खूप चांगला सकरात्मक परिणाम दिसून येतो.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’