राजकीय प्रतिनिधी : आगामी लोकसभा निवडणुकांचे बिगुल काही दिवसांतच वाजणार आहे. काँग्रेस आणि समविचारी पक्षांच्या बैठकाना जोर आल्याचं दिसत आहे. काँग्रेसने प्रचाराचा नारळ फोडला असून विविध शहर आणि ग्रामीण भागांत सभेंचं नियोजन करण्यात येत आहे. या सर्व घडामोडीत घटकपक्षांकडे काँग्रेस आणि भाजप ने काहीसं दुर्लक्ष केल्याचं दिसतय. भाजपने आठवलेंच्या रिपाई आणि महादेव जानकरांचा राष्ट्रीय समाज पक्ष चा विचार न करता जागा वाटपाचा कार्यक्रम नुकताच संपन्न केला.
मनसेला आघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादी उत्सुक असली तरी काँग्रेस मात्र मनसेला घेण्यास तयार नाही. प्रकाश आंबेडकरांच्या वंचित आघाडी शी काँग्रेसची बोलणी सूरु असून प्रकाश आंबेडकर १२ जागांवर ठाम राहत राष्ट्रीय स्वयसेवक संघा ला संविधानाच्या चौकटीत आणण्यासाठीचा कार्यक्रम सांगा तरच आम्ही युतीचा विचार करू असा सज्जड दमच दिला आहे.
दरम्यान राजू शेट्टी यांनी काँग्रेस कडे तब्बल ७ जागांची मागणी केली असून ३ जागांवर आमचा टोकाचा आग्रह राहील अस राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलं. अजून तरी काँग्रेस ने त्यांच्या कडे इतक्या गांभीर्याने पाहिलं नाही आणि अधिकृत वक्तव्य देखील काँग्रेस च्या नेत्यांनी केलं नाही आहे.