राज्याच्या राजकारणातून नारायण राणे हद्दपार – रघुनाथ कुचिक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदनगर प्रतिनिधी | राज्याच्या राजकारणातून नारायण राणे हद्दपार झाले असून त्यांना त्यांची हौस पुर्ण करायची असेल तर शिवसेना सक्षम असल्याची टीका शिवसेनेचे उपनेते रघुनाथ कुचीक यांनी केली. शिर्डीत साईदर्शनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी राणेंना लक्ष केलं. नारायण राणेंना आता राज्याच्या राजकारणात दुर्बीण घेवुन शोधाव लागेल असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला. सध्या राणे भाजपात प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे, यावर बोलताना राणेंनी हवं तिथ जावं शिवसेना त्यांना भूईसपाट करण्यास सक्षम असल्याचं कुचिक म्हणाले.

सध्या भाजप आणि शिवसेनेकडे इतर पक्षांची मंडळी येत असून शिवसेनेकडे येणारी मंडळी ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होवून येत आहेत. श्रीरामपुरचे कॉग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे हे देखील त्यातलेच एक असून त्यांना शिवसेनेचे विचार पटलेत त्यामुळे त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला असून त्यांचा प्रवेश पक्षप्रमुख उद्वव ठाकरे निश्चित करतील असंही कुचीक यांनी यावेळी स्पष्ट केलं.

Leave a Comment