पुणे | सुनिल शेवरे
आगामी लोकसभा निवडणुकांना डोळ्यांसमोर ठेवून सर्वच पक्ष आता आपापल्या पक्ष संघटनांची मोर्चेबांधणी करण्याला लागले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस तर्गे प्रभाग क्र २८ मधे नुकतेच नवमतदार नोंदनी मोहीमेचे आयोजन करण्यात आले होते. प्रभाग क्र. २८ येथील नवमतदार नोंदणी मोहीमेचे उद्घाटन राष्ट्रवादीचे प्रभाग अध्यक्ष अर्जुन गांजे यांच्या हस्ते भैयासाहेब आंबेडकर चौकात झाले. सकाळी ९ पासून दुपारी १ वाजेपर्यन्त ही नोंदणी सुरु होती. पहिल्याच दिवशी तब्बल १५० जणांनी मतदार यादीत आपलं नाव नोंदवले.
आगमी विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर प्रभागांत आता पासूनच कार्यकर्त्यांची तयारी सुरु असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. यावेळी संग्राम होनराव, संजय दामोदरे, संजय नडगेरी, अक्षय नडगेरी, दिलीप हारकुडे इत्यादी उपस्थित होते.