लॉकडाऊनमुळे लाखो मजुरांची घरी जाण्यासाठी जीवघेणी धडपड; वेध अंगावर काटा आणणाऱ्या घटनांचा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर याचा सर्वात मोठा परिणाम हातावर पोट असणाऱ्या मजुरांवर झाला आहे. या मुजरांना शहरांपर्यंत पोहचवणारी रेल्वे सेवा बंद आहे. देशभरात लाखोंच्या संख्येने स्थलांतरीत मजूर काम करत असून अशा मजुरांची संख्या दिल्ली आणि मुंबई आणि देशातील इतर महानगरांमध्ये मोठी आहे.

ज्या ठिकाणी हे मजूर काम करत होते तेथील मालकांनी त्यांना काढून दिले आहे, खिशात पैसे नाही आहेत. घरी जायला काही दळवळणाची काही साधन नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये दिल्ली, मुंबई, पुण्यासारख्या शहरातून गावाकडं जाणासाठी लोकं जीवघेण्या मार्गांचा अवलंब करत आहेत. काम बंद झाल्यानंतर आपापल्या गावी परतण्याच्या प्रयत्नांत असलेल्या मजुरांना सर्व वाहतूक सेवा बंद झाल्याने मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. यांपैकी हजारो मजूर पायीच गावी निघाल्याने करोनाच्या संसर्गाचा मोठा धोका निर्माण झाला आहे.

Untitled design - 2020-03-28T145040.486

यांपैकी बहुतेक मजुरांकडील खाण्या-पिण्याच्या वस्तू संपलेल्या आहेत. तसेच त्यांना पैशांचीही चणचण भासत आहे. या बरोबरच मोठ्या संख्येने सोबत जात असल्याने पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनानुसार सोशल डिस्टन्सिंग पाळले त्यांना शक्य होत असल्याचे स्पष्ट होत आहे. अशात अशा मजुरांना करोनाचा संसर्ग होण्याचा धोकाही निर्माण झाला आहे.

आम्ही घरी जायचे तरी कसे?

आम्हाला कोणीही कोणत्याही प्रकारची माहिती मिळत नसून आम्ही काय करायचे, कुठे जायचे असा प्रश्न या मजुरांपुढे आहे. आम्ही जायचे कुठे आणि कसे. आम्हाला थांबूही देत नाहीत आणि जाऊही देत नाहीत, चालायला लागलो की पोलिस आम्हाला अडवतात, मग आम्ही घरी कसे जावे, असा प्रश्न हे मजूर करत आहेत. दरम्यान, उत्तर प्रदेश सरकारने मजुरांसाठी बसची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हजारोंच्या संख्येने विखुरलेल्या या मजुरांचा प्रवास लॉकडाऊनच्या या दिवसांमध्ये मात्र सुरूच आहे.

अशीच काहीशी परिस्थिती देशातील इतर भागातील मजुरांची पण आहे. अहमदाबाद शहरात कामाला असलेले उत्तरप्रदेशमधील काही मजूर जयपूर पर्यंत कसेबसे पोहोचले आहेत. मात्र, रस्ते वाहतूक बंद असल्यानं त्यांनी पुढील प्रवास पायीच सुरु केला आहे. त्यातील एका मजुराने एएनआय या वृत्तसंस्थेला आपली व्यथा सांगतांना म्हटलं कि, ”मी गुजरात अहमदाबाद येथून आलो आहे. मला उत्तर प्रदेश आग्रा येथे जायचे आहे. मला अहमदाबाद सोडायचे नव्हते पण मालकाने मला पैसे आणि रेशन द्यायला नकार दिला. मी मागच्या तीन दिवसांपासून मी व्यवस्थित जेवलेलो नाही.”

घरी जाण्याची जीवघेणी धडपड
तर तिकडे दिल्ली आणि नोएडा येथील हजारो मजुरांनी कोणताही पर्याय नसल्याने शेवटी बिहारकडे पायीच कूच करण्यास सुरुवात केली आहे. गाझियाबादमध्ये पोहोचलेल्या मजुरांच्या स्थितीचे चित्र पुढे आले असून ही दृश्ये पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. उत्तरप्रदेश सरकारने या मजुरांची दाखल घेत त्यांना घरी जाण्यासाठी काही गाझियाबादमध्ये खासगी बससेवा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. या ठिकाणी हजारोंच्या संख्येने लोक गर्दी करून बसमध्ये चढण्याचा अतोनात प्रयत्न करताना दिसत आहेत. दरवाजाने आत शिरता येत नसल्याने लोक खिडकीतूनही बसमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत आहेत. यावेळी सोशल डिस्टन्सिंग पाळणे तर दूरच मात्र, सुरक्षेची काहीही काळजी घेतली जात नसल्याचे स्पष्ट होत आहे. देशभर असेच चित्र आहे.

महाराष्ट्रात मजुरांचा घरी जाण्यासाठी जीवघेणे प्रयोग
तर इकडे महाराष्ट्रात, काल रात्री मुलुंड येथील आनंद नगर टोल नाक्यावर एका टेम्पोमधून थेट उत्तर प्रदेश गाठण्याचा प्रयत्न ६४ जणांनी केला होता. मात्र नवघर पोलिसांनी हा टेम्पो अडवून त्याची तपासणी केली असता ही बाब समोर आली आहे. हे सर्व कामगार असून मुंबईच्या मुंबादेवी परिसरात राहतात. तिथे हातगाडी चालवणे, तसेच इतर मिळेल ते काम करीत होते. मात्र आता हातालाच काम नसल्याने मुंबईत नक्की कसे जगावे असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. म्हणून त्यांनी अखेर टेम्पो चालक फारुख शेख यांच्या टेम्पोमधून उत्तर प्रदेश गाठण्याचा निर्णय घेतला. हा प्रवास कमीत कमी ३ दिवस चालणार होता. मात्र कमी जागेत कसेबसे कोंबून बसून या ६४ जणांनी प्रवास सुरु केला खरा परंतु मुंबईच्या वेशीवरच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. या प्रकरणी टेम्पो चालक, मालक तसेच या लोकांना काम देणारे व्यक्ती अशा चार जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला असून या सर्वांना पुन्हा रात्री कुंभारवाडा येथे सोडण्यात आले.

Untitled design - 2020-03-28T145410.169

 

४० युवकांचा हैद्राबाद ते राजस्थान ट्रकने प्रवास
कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी संचारबंदी काळात जिल्हा बंदी आणि राज्य सीमाबंदी असताना पोलीस चौकी पार करून पोलिसाची नजर चूकवून हैद्राबादवरून वाशीम मार्गे राजस्थानला जाणाऱ्या एका ट्रकला वाशीम शहर पोलिसांनी पकडले. आज सकाळी पोलिसांनी ही कारवाई केली. या ट्रकमध्ये एकूण ४० युवक होते. हे युवक रोजगारासाठी हैद्राबादला गेले होते. ते राजस्थानला निघाले होते.

दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

 

Leave a Comment