कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
करोनामुळे संचारबंदी लागू केल्यानंतर मुंबई पुण्यातील मोठी हॉटेल्स बंद झाल्याने पुणे विभागातून संकलित होणाऱ्या २१ लाख लिटर दुधापैकी एक लाख लिटरच्या आसपास दूध शिल्लक राहण्यास सुरुवात झाली आहे. त्याचा अनुभव सहकारी दूधसंघांना आला असून भविष्यात खासगी संघांच्या संकलनावर ही परिणाम होण्याची शक्यता आहे.
पुणे विभागातून गोकुळ, राजारामबापू सहकारी संघ, कात्रज, बारामती, सोलापूर, अकलूज, शिवामृत असे मोठे सहकारी दूध संघ संकलन करतात. त्यापैकी काहींचे मुंबईला तर काहींचे दूध पुण्याला विक्री केले जाते. अन्य संघाचे त्या-त्या परिसरात दूध वितरण होते. सध्या दूध अत्यावश्यक सेवेत मोडत असल्याने त्याचे संकलन व वितरणावर परिणाम झालेला नाही. नेहमीप्रमाणे वेगवेगळ्या भागातून दूध संकलित होऊन व्यवसायाच्या ठिकाणी वितरित करण्यासाठी पाठवण्यात येत आहे. पण, संचारबंदी असल्याने मुंबई व पुण्यातील अनेक हॉटेल्स बंद करण्यात आली आहेत. त्यामुळं लाखो लिटर दूध वितरणाविना शिल्लक राहण्यास सुरुवात झाली आहे. आता या शिल्लक राहणाऱ्या दुधाचं काय करायचं असा प्रश्न दूध संघाना पडला आहे.
दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.