लोकशाही पंधरवडा अंतर्गत शहरात रॅलीद्वारे मतदान जनजागृती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर, प्रतिनिधी, सतेज औंधकर – महानगरपालिकेत लोकशाही पंधरवडा दि.26 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2020 या कालावधीत साजरा करण्यात येत आहे. निवडणूकीत 100 टक्के मतदान व्हावे यासाठी शहरात रॅलीद्वारे जनजागृती करण्यात येत असनू या अंतर्गत आज गांधी मैदान येथून मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. नगरसचिव दिवाकर कारंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही रॅली काढण्यात आली.

सदरची रॅली गांधी मैदान, खरीकॉर्नर, बिनखांबी गणेश मंदिर, मिरजकर तिकटी, बिंदू चौक अशी काढण्यात आली. तसेच महानगरपालिका व दसरा चौक येथूनही रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये विद्यापीठ हायस्कुल, राजर्षी छत्रपती शाहू महाराज हायस्कुल, एम.एल.जी हायस्कुल, यशवंतराव चव्हाण के.एम.सी कॉलेज यांनी सहभाग घेतला.

यावेळी विजय वनकुद्रे यांनी उपस्थित सर्व अधिकारी, विद्यार्थी-विद्यार्थीनी, कर्मचारी व नागरीक यांना ʇआम्ही, भारताचे नागरीक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, याद्वारे, प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपराचे जतन करु आणी मुक्त नि:पक्षपती व शांततपूर्ण वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करु अशी प्रतिज्ञा घेतली. तसेच मतदानासाठी वेळ काढा आपली जबाबदारी पार पाडा, मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो, सर्वांची आहे जबाबदारी मत देणार सर्व नर नारी, माझे मत माझा अधिकार, माझा देश माझी लोकशाही टिकवीन ती लावून बोटाला शाई अशी धोषणा दिली.

यावेळी प्राथमिक शिक्षण विभागाचे बाबा साळोख, सचिन पांडव, के.एस.पाटील, विजय माळी, अजय गोसावी, महेश आगळे, विविध विभागाचे कर्मचारी, यशवंतराव चव्हाण के.एम.सी कॉलेज शिक्षक, शिक्षिका, विद्यापीठ, एम.एल.जी, राजर्षी छत्रपती शाहू महाराज हायस्कुलचे विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते.

Leave a Comment