शरद पवारांच्या गुगली समोर पृथ्वीराज चव्हाण क्लीन बोल्ड

Sharad Pawar
Sharad Pawar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे बीसीसीआय चे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मा. शरद पवार यांच्या गोलंदाजी समोर काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण क्लीन बोल्ड झाले आहेत. सदु शिंदे ओपन स्टेडीयम च्या उद्घाटनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पवार यांनी गोलंदाजी केली तर चव्हाण फलंदाजी करत होते.

पुणे येथील तळजाई टेकडीवर सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर पवार यांना गोलंदाजी करण्यास सांगण्यात आले होते तर पृथ्विराज चव्हाण यांच्या हातात बॅट देण्यात आली होती. यावेळी चव्हाण यांना पवारांनी टाकलेला गुगली समजु नशकल्याने ते क्लीन बोल्ड झाले. दरम्यान याचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला असून पवारांच्या गुगलीवर जोरदार चर्चा होताना दिसत आहे.