सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
भाजप-शिवसेनेकडून सत्तास्थापनेचा तिढा सुटत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या बैठकाही वाढल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची बैठक कराड येथे होणार आहे.
दोन्ही नेते नुकतेच दिल्लीत जाऊन काँग्रेसच्या हायकमांड सोनिया गांधी यांची स्वतंत्ररित्या भेट घेवून आले आहेत. त्यानंतर त्यांची पहिलीच बैठक होत असल्याने आणि भाजप-सेनेतील कलहाच्या पार्श्वभुमीवर या दोन्ही नेत्यांची बैठक महत्वाची मानली जात आहे.
आज गुरुवार 7 रोजी रेठरे खुर्द ( कराड) येथे यशवंतराव मोहिते जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण ,काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, या यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत