क्रीडानगरी | ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात डाव्या खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे शिखर धवनला आगामी न्यूझीलंड दौऱ्यातून माघार घ्यावी लागली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या दोन सामन्यात दमदार अर्धशतक ठोकणाऱ्या शिखर धवनला क्षेत्ररक्षण करताना झालेल्या दुखापतीमुळे तिसऱ्या सामन्यात फलंदाजीला उतरता आलं नव्हतं.
आता भारतीय संघाला अजून एक धक्का बसला असून स्थानिक क्रिकेट खेळताना सोमवारी झालेल्या इशांत शर्माला झालेल्या दुखापतीमुळे तोही न्यूझीलंड दौऱ्यातून बाहेर पडला आहे. ही दुखापत दुर्लक्ष न करता येण्यासारखी असून किमान ६ आठवड्यांच्या विश्रांतीचा सल्ला फिजियोंनी इशांतला दिला आहे.
भारताकडे सद्यस्थितीत जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि नवदीप सैनी हे मध्यमगती गोलंदाज चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. नवदीप सैनीला अजून कसोटी क्रिकेटचा अनुभव नसल्याने इशांतच्या जागेवर पर्याय म्हणून निवड समिती कोणाचा विचार करते हे पाहणं रंजक ठरणार आहे.