वाशिम प्रतिनिधी | वाशिम जिल्ह्यात मागील वर्षी दुष्काळसदृश परिस्थिती असताना जिल्ह्यातील एकमेव रिसोड तालुका आणि जऊळका मंडळात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला. मात्र आजपर्यंत दुष्काळग्रस्तांना कोणतीही मदत व शासकीय सवलतीचा लाभ मिळाला नाही. तसेच प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजने अंतर्गत मिळणारे दोन हजार रुपये न मिळालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ देण्यात यावे.
त्यासोबतच शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, या मागण्यांकरिता आज वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष दिलीप जाधव यांच्या नेतृत्वात रिसोड येथे लोणी रोडवर दोन तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले.वरील सर्व मागण्या तात्काळ मान्य न केल्यास यापुढे उग्र आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आहे.