प्रतिनिधी उस्मानाबाद। परळी विधानसभा मतदारसंघ म्हणजे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यातील संग्रामाचे मैदान. मतदारसंघांत गेल्या ८ निवडणुकांमध्ये सात वेळा भाजपाने विजय मिळवला आहे. म्हणून या मतदारसंघाला भाजपाचा गड असे म्हंटले जाते.
हा मतदार संघ पूर्वी रेणापूर मतदारसंघ म्हणून ओळखला जात असे. या विधानसभा मतदारसंघातून गोपीनाथ मुंडे ५ वेळा विधानसभेवर निवडून गेले होते. 1985 ला एकदा मात्र पंडितराव दौंड यांच्यासमोर गोपीनाथ मुंडेंना हार पत्करावी लागली होती. परळी विधानसभा मतदारसंघाची रचना पहिल्यांदा 2009 मध्ये झाली. तेव्हापासून २ वेळा या मतदारसंघातून पंकजा मुंडेच या आमदार झाल्या आहेत.
गोपीनाथ मुंडे यांनी 2009 मध्ये पहिल्यांदा विधानसभा मतदारसंघ सोडून लोकसभेची निवडणूक लढवली. यावेळी पंकजा मुंडे यांनी परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आपल्या राजकीय वाटचालीची सुरुवात केली होती. गोपीनाथ मुडेंची पुण्याई आणि एक नाव राजकीय नैतृत्व म्हणून पंकजा मुंडेंनी विजय मिळवला होता. मात्र 2009 च्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे हे परळीतून विधानसभा लढवण्याच्या तयारीत होते परंतु पंकजा मुंडे संधी मिळाली आणि धनंजय मुंडे यांना विधानपरिषदेवर आमदार करण्यात आले. मात्र मुंडेंचे राजकीय वारस खरे आहोत असे वाटत होते. मात्र ऐन वेळी पंकजा यांना उमेदवारी मिळाली आणि त्या विजयी झाल्या. या संपूर्ण घटनाक्रमात धनंजय मुंढे हे नाराज झाले आणि त्यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
त्यातच २०१४ साली गोपीनाथ मुंडे यांचे अकाली निधन झाले. तेव्हा गोपीनाथ मुंडेंच्या कायमस्वरूपी राजकीय खुर्चीवर पंकजा विराजमान होत. त्याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी 26 हजार 184 मतांनी विजय मिळवत पुन्हा आमदारकी मिळवली. खरं तर या निवडणुकीमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली मृत्यूनंतर तयार झालेल्या सहानुभूतीमुळे पंकजा मुंडे पुन्हा विधानसभेत गेल्या.
आता यंदाच्या २०१९ च्या विधानसभा निवडुकीचे राष्ट्रवादीचे उमेदवार जाहीर झालेत. यात परळी मतदार संघातून धनंजय मुंडे परळी विधानसभा मतदारसंघातूनच निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा तेथे पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे अशी भाऊ-बहीण यांच्यातील लढत पहायला मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी एका मुलाखतीत शरद पवार यांना लक्ष्य करत सांगितलं की,पवार यांनी धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादी सोडून जाऊ नयेत म्हणून, घाई-घाईने उमेदवारी जाहीर केल्याचा आरोप पंकजा मुंडे यांनी केला आहे. तसेच ‘परळीतून मी च पुन्हा निवडून येईन’, असा विश्वासही पंकजा मुंडे यांनी या मुलाखतीमध्ये बोलून दाखवला आहे. त्यामुळे आता या परळी विधानसभेत मुंडे बहीण-भावात नेमके कोण बाजी मारणार हे पाहणे औसुक्याच ठरणार आहे.