दिल्ली प्रतिनिधी । संसदेच्या अंदाज समितीच्या अध्यक्षपदी पुण्याचे खासदार गिरीश बापट यांची लोकसभेचे सभापती ओमप्रकाश बिर्ला यांनी नियुक्ती केली.या समिती मध्ये लोकसभेमधील ३० सदस्य असणार आहेत. विधानसभेतील व राज्य मंत्रीमंडळातील असलेला प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर त्यांची ही निवड करण्यात आली आहे.
संसदेच्या अंदाज समितीच्या अध्यक्षपदी आज माझी नियुक्ती करण्यात आली.लोकसभेचे सभापती ओमप्रकाश बिर्ला यांनी नियुक्ती केली.या समिती मध्ये लोकसभेमधील ३० सदस्य असणार आहेत. #LokSabha
— Girish Bapat (@MPGirishBapat) July 26, 2019
अर्थमंत्री अंदाजपत्रक मांडत असतात,या अंदाजपत्रकामध्ये समाविष्ट केलेल्या अंदाजाची चिकित्सा करणे,शासनाच्या खर्चात काटकसर सुचवून शासकीय धोरणात आणि प्रशासकीय व्यवस्थेत कार्यक्षमता कशी वाढेल या दृष्टीने मार्गदर्शनपर सूचना करणे या सारखी कामे या समितीला करावी लागतात.