सोलापूर | धुळे हत्याकांडात मारल्या गेलेल्या मंगळवेडा तालुक्यातील त्या पाच व्यक्तींच्या नातेवाईकांनी सरकारने जाहीर केलेली मदत हातात मिळाल्याशिवाय मृतांच्या अस्थी विसर्जन न करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्हाला जोपर्यंत मदत मिळणार नाही तोपर्यंत आम्ही अस्थींचे विसर्जण करणार नाही अशी भुमिका घेऊन मृतांच्या कुटंबियांनी अस्थी झाडावर टांगून ठेवल्या आहेत.
काय आहे प्रकरण ?
१ जुलै रोजी धुळ्यातील साक्री तालुक्यातील रानपाडा गावात मुले पळवणारी टोळी समजून भारत शंकर भोसले (४५), दादाराव शंकर भोसले (३६), राजू भोसले (४७), अगणू श्रीमंत हिंगोळे (२०), भारत शंकर मावळे (४५) या पाच लोकांना बेदम मारहाण करण्यात आली होती. यातच त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पूर्ण गाव फरार झाले होते. २ जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. परंतु ही मदत मिळवून देण्याच्या दृष्टीने कोणतीच हालचाल झाली नाही. तसेच सरकारकडून कोणतेही लिखित स्वरूपाचे आश्वासन देण्यात आले नाही.
परिणामी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली मदत जोपर्यंत हातात मिळत नाही तोपर्यंत मृतांच्या अस्थी झाडावरच टांगून ठेवू असा पवित्रा मंगळवेढा येथील मृतांच्या कुटंबियांनी घेतला आहे.