बुलढाणा प्रतिनिधी। बुलढाणा जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात कामगार अधिकारी कार्यलयामार्फत विविध कामगारांना मोफत साहित्य पेटी दिल्या जात आहेत. मात्र काही कामगारांना साहित्य पेटी मिळवण्याकरीता कार्यालयात चकरा माराव्या लागता आहेत. त्यामुळं वैतागलेल्या कामगाराने अखेर हाइटेंशन टॉवरवर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
गजानन ढगे असे कामगाराचे नाव असून चिखली तालुक्यातील सातगाव भुसारी येथील तो रहिवाशुई आहे. गेले काही दिवस कामगार उपायोगी साहित्याची पेटीचे वाटप होत आहे. मात्र गजानन ढगे कामगार असूनसुद्धा शासकीय कार्यालयात साहित्य पेटी मिळावी म्हणून चकरा माराव्या लागल्या. अखेर, वैतागुन निराशाजनक मनःस्थितीत गजानन याने गावानजिक असलेल्या हाइटेंशन पॉवर टॉवरवर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
संबंधित कामगार हाइटेंशन टॉवरवर चढून आत्मदहनाच प्रयत्न करतो. ही माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली. या भागातील सामाजिक कार्यकर्ते कुणाल बोन्द्रे यांना ही माहिती कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गजानन ढगे या कामगाराशी चर्चा करून त्याला ही साहित्य पेटी आणून दिली. तेव्हा हा कामगार टॉवरवरून खाली उतरला. त्यामुळं मोठा अनर्थ टळला. परंतु आपल्या छोट्याश्या हक्कासाठी एका कामगाराला जीव धोक्यात टाकावा लागला ही बाब मात्र दुर्दैवी आहे.