दिल्ली : १८ जुलै ते १० ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी सर्व खासदारांना पत्र लिहले आहे. १६ व्या लोकसभेची फक्त ३ अधिवेशने बाकी राहिली असून येत्या काळात आपण संसदेच्या अधिवेशनाचा वेळ कारणी लावावा असे अावाहन सुमित्रा महाजन यांनी केले आहे.
सुमित्रा महाजन यांनी पत्रामधे त्यांच्या परदेश दौऱ्याचा उल्लेख करून प्रवासी भारतीय भेटल्याचा प्रसंग रेखाटला आहे. ‘मी परदेश दौर्यावर असताना प्रवासात मला अनेक भारतीय भेटले. निवासी भारतीयांनी संसदेत होणाऱ्या गदारोळाबद्दल माझ्याकडे चिंता व्यक्त केली आहे. अनेक विधेयकांना मूर्त रूप देणे बाकी असून आपण सदन चालवण्यास सहकार्य करावे’ असे सुमित्रा महाजन यांनी पत्रात म्हटले आहे.
तसेच संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार यांनी संसदेच्या अधिवेशन प्रारंभाच्या पूर्वसंध्येला सर्व पक्षीय खासदारांसाठी सुमित्रा महाजन यांच्या घरी स्नेहभोजनाचे आयोजन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ही या स्नेहभोजनात सहभागी होणार आहेत.
Home ताज्या बातम्या सुमित्रा महाजनांनी लिहले खासदारांना पत्र, संसदेच्या अधिवेशनाचा वेळ कारणी लावण्याचे अावाहन