पुणे | फेसबुक व इतर सोशल मिडियावर स्वतःची जास्तीत जास्त माहिती देणे, सतत भावनिक पोस्ट टाकणे तसेच सोशल मिडियाच्या माध्यमातून अनोळखी व्यक्तीशी सहजपणे मैत्री करणारे लोक हे सायबर गुन्हेगारांचे टार्गेट बनतात व अशा व्यक्तींची सायबर गुन्हेगार लगेचच फसवणूक करतात असे मत सायबर गुन्हे व सायबर सुरक्षा तज्ज्ञ अॅड वैशाली भागवत यांनी व्यक्त केले. सोशल मिडिया, सायबर गुन्हे, सायबर सुरक्षा आणि युवक व मानसिक आरोग्य ; समस्या आणि आव्हाने या विषयावर कर्वे समाज सेवा संस्था, रोटरी क्लब ऑफ पुना वेस्ट, मनोदय मेंटल हेल्थ फोरम आणि पुणे पोलीस सायबर गुन्हे सुरक्षा विभागाने कर्वे समाजकार्य महाविद्यालयामध्ये एकदिवसीय राज्यस्तरीय परिषद आयोजित केली होती. या परिषदेमध्ये अॅड भागवत युवकांना मार्गदर्शन केले त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी अॅड भागवत म्हणाले की, सोशल मिडियावरील केल्या जाणाया पोस्टचे निरीक्षण हॅकर करत असतात. जे लोक जास्त तीव्रतेने भावनिक पोस्ट करतात. अशांना हॅकर टार्गेट करतात. अशा लोकांना भावनिक पोस्ट पाठवणे, आपण त्यांना खुप चांगल समजूण घेतो हे सिध्द करत हॅकर त्यांचा विश्वास संपादत करतात. नंतर भावनिककरत त्यांच्या कडून विविध काम करून घेतात. मोमो आणि ब्लू व्हेल या प्रकारेच काम करतात. तरूण मुलींना प्रेमाच्या जाळयात ओढून मानवी तस्करीचे अनेक प्रकार होतात करतात. यामुळे सोशल मिडिया सावधगिरीने हाताळावे.
यावेळी गिरीश जोशी म्हणाले की वयस्कर माणसे टेक्नॉलॉजी शिकण्यासाठा उत्सुक नतात. त्यामुळे ४५ वयोगटातील व्यक्तीची ऑनलाईन आर्थिक फसवणूक होण्याचे प्रमाण जवळपास ७०% आहे.सायबर सुरक्षतेकडे अद्याप गांभीर्याने पाहिले जात नाही. यावेली ऑनलाईन आर्थिक फसवणूक कशी होते. याचे अनेेक उदाहरणेजोशी यांनी दिली. फेसबुक वरील माहिती आणि फोटोचा वापर करून आर्थिक फसवणूक केली जाते. फेसबुकवरील डाटा मोठया प्रमाणात चोरीलाजातो. या डाटाच्या आधारे सायबर गुन्हे केले जात आहे. यामुळे सतत फेसबुक वर आपली माहिती टाकत जाऊ नका असे मत लेखक अतुल कहाते यांनी व्यक्त केले.
डॉ दिपक शिकारपुर यांनी सांगितले की, अनेकाना सेल्फीचे व्यसन लागले आहे. काही काळानंतर सेल्फी व्यसनमुक्तीचीकार्यशाळा घ्यावी लागणार आहे. तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात बदलत आहे. भविष्यात काय खावे, कसे रहावे हे सगळ तुमचा स्मार्टफोन सांगेल. यावेळी कर्वे समाज सेवा संस्थेचे संचालक डॉ दिपक वलोकर हेम्हणाले की सोशल मिडियाच्या अतिरिक्त वापरामुळे ३० ते ४० % लोकांना मानसिक आजार झाला आहे.
सायबर गुन्ह्यासंबंधी पुणे पोलिसांच्या सायबर क्राईम विभागाकडे एका वर्षात जवळपासआठ हजार तक्रारी आल्या असून या तक्रारीनुसार गुन्हेगारांना पकडले देखील आहे. ऑनलाईन फसवणूक किंवा इतर सायबर क्राईम संबधी तक्रार असल्याल सायबर क्राईम विभागाशी नागरीकांनी संपर्क साधावा असे आवाहन सायबर क्राईम विभागाच्या पोलिस उपनिरीक्षक अलका जाधव यांनी केले.
या कार्यक्रमाचे संयोजन संस्थेचे संचालक व मासवे संघटनेचेअध्यक्ष डॉ.दीपक वलोकर, सी.एस.आर. सेल चे मानद संचालक तथा परिषदेचे निमंत्रक डॉ. महेश ठाकूर, मेंटल हेल्थ फोरम चे कार्याध्यक्ष तथा परिषदेचं समन्वयक प्रा. चेतनदिवाण, रोटरी क्लब ऑफ पुना वेस्ट चे अध्यक्ष रोटरीयन चारू श्रोत्री
रोटरीयन कल्याणी गोखले व पुणे पोलीस सायबर सेलच्या पोलीस उपायुक्त ज्योती प्रिया सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. सोशल मीडिया, सायबर गुन्हे, सायबर सुरक्षा व युवकांचे मानसिक आरोग्य या विषयी पार पडलेल्या या परिषदेस महाराष्ट्रभरातील विविध महाविद्यालयांतून अनेक शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
या परिषदेमध्ये दै सकाळ चे वृत्त संपादक माधव गौखले, ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशनचे सदस्य डॉ दिपक शिक्ररापुर, टेक केअर गुडनाईट सिनेमाचे दिग्दर्शक गिरीश जोशी, लेखक अतुल कहाते, पुणे सायबर क्राईम विभागातील पोलिस उपनिरीक्षक अलका जाधव, जेष्ठ मनोविकार तज्ञ डॉ. सुप्रकाश चौधरी, डॉ वासुदेव परळीकर, पुणे विद्यापीठाचे विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे डिन डॉ अरविंद शालीग्राम, डॉ शैलेश पालेकर, कल्याणी गोखले, चारू श्रोत्री, डॉ. महेश ठाकूर आदी तज्ञांनी विविध विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले. परिषदच्या यशस्वीतेसाठी कर्वे समाज सेवा संस्थेच्या समुपदेशन विभाग व एम. एस. डब्ल्यू च्या विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.