नवी दिल्ली | स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभुमीवर राजधानी दिल्लीतील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. दिल्ली मेट्रो तसेच आय.जी.आय. विमानतळ परिसरात अतिरिक्त ६०० सुरक्षा रक्षकांची कुमक वाढवण्यात आली आहे. सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरीटी फोर्स च्या या जवानांकडे एकुण २१० मेट्रो स्थानकांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
‘सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात आम्ही बैठका घेतल्या असून १५ आॅगस्ट पूर्वी काही माॅक ड्रिल घेऊन आम्हाला सज्ज व्हायचे आहे’ असे पोलिस महासंचालक रघुबील लाल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगीतले आहे. तसेच ५००० सीसीटिव्ही कॅमेर्यांनी दिल्ली परिसरात सदैव वाॅच ठेवणारी नविन कंट्रोल रुम बनवण्यात आली असून रेल्वे स्थानकांवरील गर्दीवर लक्ष ठेवणे त्यामुळे सोपे होणार आहे. असेही लाल यांनी यावेळी सांगीतले.