ह्युस्टनमध्ये भारतीय वंशाच्या शीख पोलीस अधिकाऱ्याची हत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

ह्युस्टन | परदेशातील शीख भारतीय व्यक्तींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.अमेरिकेतील ह्युस्टन इथे अमेरिकेचे पहिले पगडीधारक शीख पोलीस अधिकारी संदीप सिंग धालीवाल यांची शुक्रवारी अज्ञात इसमांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. ह्युस्टन येथील नॉर्थ वेस्ट हॅरिसजवळच्या ट्रॅफिक सिग्नलवर ही घटना घडली असून या घटनेने अमेरिकेसह भारतात खळबळ उडाली आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी आपल्या ट्विटर हॅन्डलवरून ही माहिती दिली असून मागील आठवड्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाल्यानंतर अशाप्रकारची घटना घडल्याने स्थानिक भारतीयांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. वैयक्तिक भांडणातून ही हत्या झाली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून याप्रकरणी अधिक चौकशी सुरु असल्याचं शेरीफ गोन्झालेझ यांनी सांगितलं. सहकार्य भावनेतून कार्य करणारे अधिकारी म्हणून धालीवाल यांची ओळख होती. त्यांच्या हत्येने अमेरिकेतील शीख बांधवांमध्ये निर्माण झालेली वेदना आम्ही समजू शकतो असं गोन्झालेझ यांनी सांगितलं.

 

Leave a Comment