७/१२ उताऱ्यात झालाय मोठा बदल! त्वरित करा अर्ज, नुकसान टाळा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकऱ्यांसाठी सातबारा उतारा खूप महत्त्वाची गोष्ट असते. सातबारा उताऱ्यावरती जमिनी विषयी सर्व काही माहिती असल्यामुळे शेतकऱ्यासाठी ते एक ओळखपत्रच ठरते. कुठलीही शासकीय योजना घेण्यासाठी सातबारा हे प्राथमिक कागदपत्रांमध्ये येते. आता सातबारा उताऱ्याबाबत मोठी बातमी मिळते आहे. सातबारा उताऱ्यामध्ये मोठा बदल होत आहे. मार्च पर्यंत त्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.

सातबारा उताऱ्यामध्ये शेतकरी मोठ्या कष्टाने आर्थिक पदरमोड करून पोट खराब असलेल्या क्षेत्रामध्ये सुधारणा करून ते क्षेत्र लागवडीखाली आणूनही, त्याची सातबारा यात नोंद केली जात नव्हती. उताऱ्यावर ती नोंद ही ‘पोटखराबा क्षेत्र’ अशीच होती. यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज, पिक विमा, नैसर्गिक आपत्तीत नुकसान भरपाई इत्यादी. शासनाच्या योजनांपासून वंचित राहावे लागत होते. तसेच शासनाला शेतकऱ्यांपासून मिळणाऱ्या शेतसाऱ्या पासूनही वंचित राहावे लागत होते. पण आता मार्चअखेरीस नगर जिल्ह्यातील पोटखराब शेत जमिनीच्या शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर पोटखराब क्षेत्र ऐवजी लागवडी योग्य क्षेत्र अशी नोंद होणार आहे. यामुळे या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकणार आहे.

पोटखराब शेत्रातील शेतकऱ्यांना स्थानिक तलाठ्याकडे यासाठी अर्ज करावा लागणार आहे. पोटखराब क्षेत्राच्या पीक पाण्याचा सर्वे स्थानिक तलाठी आणि भूमी अभिलेख विभाग करतील. याबाबतचा अंतिम निर्णय हा उपविभागीय अधिकारी म्हणजेच प्रांत अधिकारी यांचा असेल. प्रांत अधिकारी याबाबतचे अहवाल वेळोवेळी जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करतील. मार्च अखेरीस पोटखराब जमिनीचा महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यांतर्गत लागवडीयोग्य क्षेत्रात समावेश करून देण्यात येणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.