घरफोडी : दीड लाख रुपय किंमतीचा ऐवज लंपास

Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नशिक प्रतिनिधी | भिकन शेख ,

संपूर्ण कुटुंब रात्री घरात झोपलेले असताना तिघा चोरट्यानी घरात प्रवेश करून घरातील सोन्याचे दागिने ठेवलेली लोखंडी पेटी पळवल्याची घटना हिंगणवेढे (ता. जि. नाशिक) येथे रविवारी (दि.२८) पहाटे अडीच वाजता घडली.

या घरफोडीत रमेश विनोबा धात्रक (वय ५८) यांच्या घरातील ७७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे १ लाख ५४ हजार रुपये किंमतीचे दागिने चोरीस गेले आहेत.रमेश धात्रक यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात या घरफोडीबाबत फिर्याद दिल्यानंतर नाशिकरोड पोलिसांनी अज्ञात तीन इसमांविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.

या घरफोडीची माहिती मिळाल्यावर नाशिकरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नीलेश माईनकर, उपनिरीक्षक एस. सी. सोनोने यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घरापासून काही अंतरावर गेल्यावर या चोरट्यानी लोखंडी पेटी फोडून त्यातील १ लाख ४० हजार रुपये किंमतीची ७० ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, ४ ग्रॅम वजनाची ८ हजार रुपये किंमतीची सोन्याची अंगठी आणि ३ ग्रॅम वजनाची ६ हजार रुपयांची अंगठी असे एकूण ७७ ग्रॅम वाजनाचे सोन्याचे दागिने लंपास केले. या घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास शेळके करीत आहेत.