राज्यात विविध विभागात दीड लाख पदांची भरती होणार; अजित पवारांची मोठी घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी निवडणुकांसाठी राजकिय पक्ष जोरदार तयारी करताना दिसत आहे. सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)  ही महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात दौरे करत आहेत. तसेच त्यांच्याकडून अनेक महत्त्वाच्या घोषणा देखील करण्यात येत आहेत. आता नुकतीच अजित पवार यांनी आणखीन एक मोठी घोषणा केली आहे. राज्यात लवकरच विविध विभागात दीड लाख पदांची भरती (Government Jobs)  करण्यात येईल अशी माहिती आज माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी दिली आहे. या भरतीमुळे राज्यातील बेरोजगारीचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे.

दीड लाख पदांची भरती

आज माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी सांगितले की, मी काल दिवसभर राज्यांतील नोकरभरती संदर्भातील बैठकीत होतो. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. आता लवकरच राज्यांतील राज्यातील आरोग्य, शिक्षणासह अनेक विभागात 1.5 लाख नोकरभरती होणार आहे. या पदांवरील कर्मचारी निवृत्त होण्यापूर्वी किमान तीन महिने आधी भरती प्रक्रिया सुरू करण्यात येईल. याबाबत अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देखील दिल्या आहेत.

अजित पवार ट्रोल

दरम्यान गुरूवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नांवरून उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांचे भेट घेतली. या भेटीनंतर मनोज जरांगे यांनी आपले उपोषण मागे घेतले. परंतु या सगळ्या घडामोडी राज्यात सुरू असताना उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांना ट्रोल केले जात होते. त्यानंतर आज त्यांनी काल आपण नोकरभरती संदर्भात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत होतो अशी माहिती दिली आहे.

राष्ट्रीय लघु उद्योगकडून पदभरती सुरु

नुकतीच राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळाने देखील असिस्टंट मॅनेजरच्या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. मंडळ इच्छुक उमेदवारांकडून असिस्टंट मॅनेजरच्या पदासाठी अर्ज मागवून घेत आहे. या पदासाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 29 सप्टेंबर सायंकाळी 6 वाजेपर्यंत आहे. ज्या उमेदवारांना या पदभरतीची आणखीन माहिती जाणून घ्यायची आहे त्यांनी NSICच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.