हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरसची भीती भारतातही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सोमवारपर्यंत दि. १६ पर्यंत देशभरात जवळपास 116 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे. यात 17 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. तसेच कोरोनामुळे देशात आतापर्यंत दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान जगभरात अनेक देशांमध्ये भारतीय नागरिक कोरोनाच्या सावटाखाली अडकलेले आहेत. या नागरिकांना भारत सरकार देशात आनत आहे. आतापर्यंत इराण, इटली आणि चीनमधून भारतीय नागरिकांची सुटका करण्यात आली आहे.
कोरोनासंदर्भात केंद्र सरकार सरकारांकडून मोठया प्रमाणावर जनजागृती केली जात आहे. तसं तसेच कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. अनेक ठिकाणी शाळा, महाविद्यालये, आणि मॉल्सदेखील बंद करण्यात आले आहेत. कोरोनाच्या भीतीने अनेक ठिकाणचे सार्वजनिक कार्यक्रमही पुढे ढकलण्यात येत असल्याच समोर आलं आहे.
देशातील १४ राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या खालीलप्रमाणे –
एकूण रुग्ण – ११६
दिल्ली – ७
हरियाणा – १४
केरळ – २२
तमिळनाडू – १
जम्मू-काश्मीर – २
पंजाब – २
कर्नाटक – ६
महाराष्ट्र – ३२
आंध्र प्रदेश – १
उत्तराखंड – १
ओडिशा – १
राजस्थान – ४
तेलंगणा – ३
उत्तर प्रदेश – १३
लद्दाख – ३