सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे ,
आज पर्यंत आपण ५ ते १० हजाराची पैज लावलेली पहिली असेल मात्र सांगलीत चक्क १ लाख रुपयांची पैज लावली आहे. ही पैज आपलाच नेता जिंकून येणार या वरून ही पैज लागली आहे. आता या पैजेची सांगली आणि मिरजेत जोरदार चर्चा होत आहे.
लोकसभेची निवडणूक नुकताच सांगली मध्ये पार पडली. या निवडणुकीत तिहीरी लढत पहावयास मिळाली.. तर विध्यमान खासदार संजय पाटील आणि काँग्रेस आघाडीचे स्वाभिमानीचे उमेदवार विशाल पाटील यांच्यात चुरस आहे.मतदान प्रक्रिया नुकतीच पार पडली आहे. अनेक जण तर्क वितर्क लावत आहेत. कोण्ही म्हणते विशाल पाटील येणार तर कोण्ही म्हणतंय संजय पाटील येणार. अशी चर्चा जोरदार सांगली जिल्ह्यात होत आहे.पण विशाल पाटील आणि संजय पाटील यांच्या कार्यकर्त्याने चक्क १ लाखाची पैज च लावली आहे.
मिरजेच्या मार्केट कमिटी मध्ये राजाराम कोरे भाजपचे कार्यकर्ते तर रणजित देसाई काँग्रेस चे कार्यकर्ते दोघे जण बसले होते. हे दोघे मित्र आहेत. पण दोघांचे नेते वेगळे आहेत. दोघे जण आपलाच नेता निवडून येईल अशी टीका टिपणी करू लागले. आणि अत्यंता दोघांनी पैज लावायची ठरवली. काही पत्रकार आणि जेष्ठ लोकांच्या समोर तब्बल १ लाखाची पैज लावली. आणि तशी रोटरी ही केली आणि चेक ही दोघांनी जमा केले आहेत. येत्या २३ तारखेला निकाल लागल्यावर कोण निवडून येईल त्या नंतर 24 तारखेला या पैजेची रक्कम त्याला मिळणार आहे. मात्र या दोघांच्या पैजेची चर्चा मिरज तालुक्यात होत आहे.