स्वातंत्र्यशाहिरांच्या संपूर्ण कुटुंबाला करंट देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न; आरोपींनी असा रचला डाव..

sangali news

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्याच्या वांगी गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी स्वातंत्र्यवीर शाहीर शंकरराव निकम यांच्या संपूर्ण कुटुंबाला विजेचा करंट देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र रचलेला कट फसल्यामुळे संपूर्ण कुटुंब सुखरूपपणे वाचले आहे. शंकरराव निकम यांचा मोठा मुलगा अशोक निकम यांच्या घरासमोर व मागील बाजूच्या दरवाजाला विजेच्या … Read more

शिवछत्रपती कुस्ती चषक 2023 : सांगली व सातारा जिल्ह्यातील मल्लांची मॅटवरील कुस्ती स्पर्धा चुरशीच्या

Wrestlers Competition Supane

कराड प्रतिनिधी| विशाल वामनराव पाटील शिवजयंती निमित्त सातारा व सांगली जिल्ह्यातील आयोजित शिवछत्रपती कुस्ती चषक 2023 दोन दिवस झाली. या स्पर्धेत मोठ्या प्रमाणावर मल्लांनी सहभाग नोंदवला. सुपने (ता. कराड) येथे मॅटवरील कुस्त्या झाल्या. या स्पर्धेचा शुभारंभ सिक्कीमचे माजी राज्यपाल व खासदार श्रीनिवास पाटील, सरपंच विश्रांती पाटील, राहुल चव्हाण, सारंग पाटील, पोलिस उपअधीक्षक रणजित पाटील, प्रादेशिक … Read more

Satara News उड्डाण पुलावर पंक्चर काढताना ट्रकने उडविले : 2 ठार, 1 जखमी

Pick up Accident

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके पुणे- बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पाचवड येथील उड्डाण पुलावर काल रात्री सव्वा एक वाजण्याच्या सुमारास पंक्चर झालेले चाक काढण्यासाठी थांबलेल्या पिकअपला ट्रकने धडक दिली. या अपघातात दोन जणांचा मृत्यू तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली. जखमीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असून घटनेची नोंद भुईज पोलीस ठाण्यात झालेली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली … Read more

कराड- पंढरपूर रस्त्यावर टॅंकरने दोन महिलांना उडविले : एक जागीच ठार

Accident News Karad- Pandharpur Road

सांगली | झरे (ता. आटपाडी) येथे कराड- पंढरपूर रस्त्यावर चालकाचा ताबा सुटल्याने भरघाव टँकरने दोन महिलांना उडविले. यामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरी महिला गंभीर जखमी झाली. यामध्ये दोन दुचाकींचा चुराडा झाला. संगीता प्रकाश पवार (वय ४५, रा. तरसवाडी, ता. खटाव, जि. सातारा) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. तर राणी सुरेश पवार … Read more

भपकेबाज कार्यक्रमाला फाटा देत आधारकार्ड कॅम्प राबवून केला वाढदिवस साजरा

सांगली | सध्या समाजामध्ये दिखावेगिरीला प्रचंड प्राधान्य दिले जाते.अगदी छोटा – मोठा कार्यक्रम असेल तरी भपकेबाज आणि दिखाऊगिरी करणारे कार्यक्रम आयोजित करून कार्यक्रमाचे नियोजन केले जाते पण मुढेवाडी ता. आटपाडी ( सांगली ) येथील अक्षय नामदेव खोत या युवकाने अशा सगळ्या बाबींना फाटा देत एक नवीन आदर्श लोकांसमोर घालून दिला आहे. अक्षयने वाढदिवसाआधी गावातील लोकांच्या … Read more

..आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी खुर्चीवरुन उठून उभे राहून त्यांना हात जोडले; कोण होते ते लोक?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगली जिल्ह्यातील पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी गेले असता जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी पूरपरिस्थितीचा संपूर्ण आढावा घेतला. यावेळी काही लोक मुख्यमंत्री ठाकरेंना निवेदन द्यायला आले होते. त्यांना पाहून ठाकरे खुर्चीवरुन उठून उभे राहिले अन् त्यांना विनम्रतेने हात जोडले. मुख्यमंत्र्यांचा तो फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होतो आहे. या फोटोतील ती व्यक्ती … Read more

अबब!!! नागरीवस्तीत आढळली तब्बल १२ फुटी अजस्त्र मगर

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे जिल्ह्यात महापुरानंतर आता मगरींचे संकट समोर आलं आहे. सांगली शहरासह कसबे डिग्रज, भिलवडी, औदुंबर परिसरात पुराच्या पाण्यात मगरींचा मुक्त संचार सुरू आहे. पाणी ओसरू लागताच घराकडे परतणार्‍या लोकांना मगरींचा सामना करावा लागत आहे. बुधवारी सकाळी सांगलीवाडी येथील धरण रोड परिसरातील वीर मराठा चौक येथे तब्बल १२ फुटी अजस्त्र मगर शेतकडेला … Read more

राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सांगली जिल्ह्यात झालेल्या पूरस्थितीची पाहणी करताना काँग्रेसचे नेते आणि राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाला आहे. पलूस तालुक्यातील अंकलखोप येथे हा अपघात झाला असून 2 पोलीस कर्मचाऱ्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान विश्वजित कदम मात्र सुखरूप आहेत. विश्वजीत कदम हे आपल्या मतदारसंघातील अंकलखोप येथे पूर परिस्थितीची पाहणी करत … Read more

पूरग्रस्तांना दोन दिवसात आर्थिक मदतीची घोषणा होणार – अजित पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात धुव्वाधार पावसामुळे महापूर आला. अनेक ठिकाणी लोकांचे पुनर्वसन करण्यात आले.काही ठिकाणी दरड कोसळून जीवितहानी झाली. या सर्व घटनेनंतर राज्य सरकार सर्व पूरग्रस्तांना मदत करेल असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. पूरग्रस्तांना दोन दिवसात आर्थिक मदतीची घोषणा करण्यात येईल असे अजित पवारांनी सांगितले. ते सांगली येथे … Read more

धक्कादायक ! नवजात अर्भक फेकले नाल्यात; माणुसकीला काळीमा फासणारी घटना

सांगली | शहरातील दक्षिण शिवाजीनगर परिसरात असणाऱ्या चांदणी चौक येथील अप्पा कासार झोपडपट्टी येथील एका नाल्यात चार महिन्यांचे पुरुष जातीचे अर्भक आढळले. परिसरातील नागरिकांनी मृत अर्भक नाल्यात पडल्याचे पहिले, त्यांनी याची माहिती विश्रामबाग पोलिसांना दिली. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस, महापौर आणि आयुक्त तातडीने दाखल झाले. पोलिसांनी अर्भकाला बाहेर … Read more