18,19,20 जानेवारीला पुण्यातील 1 लाख मोबाइल बंद पडणार?? नेमकी भानगड काय??

Viral Poster
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| “पुणे तिथे काय उणे” ही म्हण आजवर आपण ऐकतच आलो आहोत. पुण्यातील पाट्या, पुण्यातील पोस्टर आणि पुण्यातील म्हणी कायमच चर्चेत असतात. सध्या असाच एक सर्वांना प्रश्नात पाडणारा नवीन पोस्टर पुण्यात चर्चेचा भाग बनला आहे. येत्या 18,19,20 जानेवारीला पुण्यातील 1 लाख मोबाइल स्विच ऑफ होणार असे बॅनर वर लिहिले आहे, त्यामुळे नक्कीच यामुळे पुणेकरांची झोप उडेल. पण हे प्रकरण नेमकं आहे तरी काय हे आज आपण जाणून घेऊयात.

पोस्टरवर काय लिहले आहे?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पुण्यातील पोस्टरवर लिहले आहे की, “18,19,20 जानेवारी सायंकाळी पुण्यातील किमान एक लाख मोबाइल स्विच ऑफ होतील.” परंतु हा पोस्टर नेमका कोणी आणि कशासाठी लावला? हे कोणाला माहित नाही. पुण्यातील अनेक चौकांमध्ये सध्या असे पोस्टर लावण्यात आले आहेत. मात्र पोस्टर लावण्याचे कारण कोणाला देखील माहित नाही. तसेच या पोस्टरमुळे नागरिकांच्या मनात अनेक संभ्रमण निर्माण झाली आहे.

https://www.instagram.com/reel/C18nmrPtE7D/?igsh=MW4zMTlkZTR3Z2xvMg==

यामागील कारण काय?

पुण्यातील अनेक चौकांमध्ये अशा आशयाचे पोस्टर लावण्यात आल्यामुळे 18, 19, 20 जानेवारी रोजी खरंच मोबाईल स्विच ऑफ होतील का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र असे काही देखील होणार नाही. कारण पुण्यामध्ये असे पोस्टर एका ऍड कॅम्पियनसाठी लावण्यात आले आहेत. या कॅम्पियनमध्ये डॉ. विश्वास कुमार यांची “अपने अपने राम” यांची कथा आहे. हे पोस्टर लावल्या मागे दुसरे कोणतेही कारण नाही. तर फक्त जाहिरातीच्या कॅम्पियनसाठी असे पोस्टर लावण्यात आले आहेत.