Reliance AGM 2021 : दर 10 पैकी 1 कोरोना रूग्णाला रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये बनलेला ऑक्सिजन फ्रीमध्ये मिळाला – नीता अंबानी

मुंबई । गुरुवारी रिलायंस इंडस्ट्रीज (Reliance Industries) च्या 44 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला (Annual General Meeting) निता अंबानी यांनी संबोधित केले. कोरोनाच्या काळात रिलायन्स फाउंडेशनने केलेल्या कामांचा उल्लेख नीता अंबानी यांनी यावेळी केला.

रिलायन्स फाऊंडेशनने कोरोनाशी लढण्यासाठी 5 मोहिमा सुरू केल्या आहेत, असे निता अंबानी यांनी सांगितले. त्याअंतर्गत मिशन ऑक्सिजन, मिशन कोविड इन्फ्रा, मिशन अन्न सेवा, मिशन एम्प्लॉयी केअर आणि मिशन लस सुरक्षा यांचा समावेश आहे. AGM मधील भागधारकांना संबोधित करताना नीता अंबानी म्हणाल्या की,” यावर्षी नवी मुंबईत जिओ इन्स्टिट्यूट सुरू होईल.”

रिलायन्स देशातील एकूण मेडिकल ग्रेड लिक्विड ऑक्सिजनपैकी 11% उत्पादन करीत आहे.
भागधारकांना संबोधित करताना नीता अंबानी म्हणाल्या की,” आज रिलायन्स देशातील एकूण मेडिकल ग्रेड लिक्विड ऑक्सिजनपैकी 11% उत्पादन करीत आहे. तेही यापूर्वी कधीही अशा ऑक्सिजनचे उत्पादन झाले नाही.” त्या म्हणाल्या की,” रिलायन्स इंडस्ट्रीजने (RIL) अवघ्या 2 आठवड्यांत 1100 mt प्रति दिन ऑक्सीजन तयार करण्याचा विक्रम केला आहे. सध्या रिलायन्स देशात एकाच ठिकाणी ऑक्सिजन उत्पादन करणारी सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. देशातील प्रत्येक 10 कोरोना रुग्णांपैकी 1 रुग्णाला रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये बनलेला ऑक्सिजन मिळत आहे. हे ऑक्सिजन त्यांना विनाशुल्क दिले जात आहे.

मुंबईत 250 बेड्सचे कोविड डेडिकेटेड रुग्णालय आहे
नीता अंबानी म्हणाल्या की,” कोविडशी लढण्यासाठी कोविड केअरची मजबूत पायाभूत सुविधा आवश्यक आहे. आम्ही आमच्या मिशन कोव्हीड इन्फ्राद्वारे हे मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोना उद्रेकानंतर काही दिवसातच आम्ही मुंबईत 250 बेडचे कोविड डेडिकेटेड रुग्णालय स्थापन केले.” त्या म्हणाल्या की,” कोविडची दुसरी लाट आली तेव्हा आम्ही 875 अतिरिक्त बेड्स बसवले. आम्ही कोविड केअरसाठी देशभरात 2000 बेड्सची व्यवस्था केली जे ऑक्सिजनच्या पुरवठ्यासह पूर्णपणे सुसज्ज होते. त्या असेही म्हणाल्या की,” कोरोनाबरोबरच्या या लढाईत संपूर्ण वैद्यकीय टीम हेच खरे हिरो आहेत. त्यांनी आपले आयुष्य धोक्यात घालून अनेक लोकांचे प्राण वाचवले.”

दररोज 15,000 कोरोना टेस्टिंग क्षमता तयार आहे
नीता अंबानी म्हणाल्या कि, “रिलायन्स फाउंडेशनने मिशन लस सुरक्षा सुरू केली आहे. याअंतर्गत केवळ रिलायन्सचे कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबियच नव्हे तर भागीदार कंपन्या आणि त्यांचे कर्मचारी, रिटायर्ड कर्मचार्‍यांनाही मोफत लसीकरण देण्यात आले.” त्या पुढे म्हणाल्या की,” आम्ही दररोज 15,000 कोरोना टेस्टिंग क्षमता तयार केली आहे. नीता अंबानी म्हणाल्या की,” आमचे रिलायन्स कुटुंब आम्हाला धैर्य देते आणि हे विशाल कुटुंब आमच्यासाठी प्रेरणास्थान आहे.”

7.5 कोटीहून अधिक गरजूंना अन्न पुरवले
मिशन अन्न सेवेचा संदर्भ घेताना नीता अंबानी म्हणाल्या की,”लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात आम्ही ही मोहीम सुरु केली जेणेकरून गरजू लोकांना अन्न मिळेल आणि त्यांना भुकेल्या पोटी झोपू लागू नये. मानवांबरोबरच आम्ही हे देखील सुनिश्चित केले की, भटके प्राणी आणि गुरेढोरे देखील भुकेले राहणार नाहीत. आज हा जगातील कोणत्याही कॉर्पोरेटद्वारे चालविला जाणारा सर्वात मोठा अन्न कार्यक्रम आहे. आतापर्यंत आम्ही 7.5 कोटीहून अधिक गरजू लोकांना अन्न पुरवले आहे.”

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group