सातारा प्रतिनिधी | शुभम बोडकेे
सातारा जिल्ह्यात बुधवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये 1 हजार 15 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 693 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये 10 हजार 381 चाचण्या तपासण्यात आल्यानंतर त्यामध्ये पाॅझिटीव्ह रेट 9. 78 इतका आहे.
जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 9 हजार 815 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 2 लाख 503 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण 1 लाख 86 हजार 513 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. तर कालपर्यंत 4 हजार 812 बाधितांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी दिवसभरात 18 कोरोना बाधितांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.
सातारा जिल्ह्यात पाॅझिटीव्ह रेट हा कमी होत नसल्याने प्रशासनासह नागरिकांच्यात चिंतेचे वातावरण पहायला मिळत आहे. जिल्ह्यातील परिस्थिती जैसे थे असल्याने व्यापारी वर्गातून प्रशासनाच्या कामकामाजावर नाराजी व्यक्त केली जात आहे. लोकप्रतिनिधी किंवा प्रशासन या परिस्थितीबाबत किती गांभीर्याने हाताळत आहेत, हा आता संशोधनाचा विषय बनला आहे.