हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अफगाणिस्तानमधील एका शाळेत भीषण स्फोट झाल्याची घटना बुधवारी घडली आहे. या भीषण स्फोटामध्ये 16 लोकांचा मृत्यू झाला असून तर 24 जण जखमी झाले आहेत.
अफगाणिस्तानमधील मदरशात बुधवारी नमाज अदा करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक जमले होते. यावेळी या ठिकाणी भीषण स्फोट झाल्याची मोठी घटना घडली. या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला आहे. अफगाणिस्तानातील ऐबक शहरात झालेल्या भीषण स्फोटामुळे एकच खळबळ उडाली आहे.
16 killed, 24 wounded in north Afghanistan blast
Read @ANI Story | https://t.co/BtXUuY9ruR
#Afghanistanblast pic.twitter.com/4Gq4uEsZZC— ANI Digital (@ani_digital) November 30, 2022
दरम्यान, यापूर्वीही अफगाणिस्तानात आयएसआयएस दहशतवादी संघटेने मशिद आणि नमाज अदा करताना स्फोट केले आहेत. त्यांच्याकडून नेहमीच अफगाणिस्तानातील शिया समुदायातील लोकांना लक्ष्य केले जात आहे. ऑगस्ट महिन्यात देखील काबूलमध्ये एका मशिदीत झालेल्या स्फोटात 21 लोक मारले गेले होते.ऑक्टोबर महिन्यात देखील काबूलमध्येही स्फोट झाला. त्या भीषण स्फोटात 52 लोकांचा मृत्यू झाला होता. मृत्यूमध्ये तरुणींचा सामावेश अधिक होता.