डिसेंबरमध्ये 10 मोठ्या कंपन्यांची IPO तयारी ; 20000 कोटी रुपयांचा निधी उभारणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । डिसेंबर महिन्यात किमान 10 मोठ्या कंपन्या IPO मार्फत एकूण 20000 कोटी रुपये उभारण्याच्या तयारीत आहेत. मर्चंट बँकर्सच्या माहितीनुसार या यादीत विशाल मेगा मार्ट, ब्लॅकस्टोनच्या मालकीची डायमंड ग्रेडिंग कंपनी इंटरनॅशनल जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूट इंडिया लिमिटेड, शिक्षण केंद्रित NBFC फायनान्शियल सर्व्हिसेस, TPG कॅपिटल साई लाइफ सायन्सेस, रुग्णालयांची साखळी चालवणारी पारस हेल्थकेअर आणि DAM कॅपिटल अ‍ॅडव्हायजर्स यांसारख्या कंपन्यांचा समावेश आहे.

कंपन्यांचे IPO उद्दिष्ट

या कंपन्या IPO च्या माध्यमातून 20000 कोटी रुपये उभारण्याचे उद्दिष्ट ठेवत आहेत. IPO मध्ये नव्या शेअर्स आणि ऑफर फॉर सेल (OFS) या दोन्ही गोष्टींचा समावेश असणार आहे . तसेच विशाल मेगा मार्ट IPO च्या माध्यमातून 8000 कोटी रुपये उभारण्याची योजना आखत आहे. हा पूर्णपणे ऑफर फॉर सेल असेल, ज्यामध्ये प्रमोटर समायत सर्व्हिसेस LLP आपले शेअर्स विक्रीसाठी उपलब्ध करतील.

डिसेंबरमध्ये IPO आणण्याची तयारी

इंटरनॅशनल जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूटचे (इंडिया) 4000 कोटी रुपये उभारण्याचे उद्दिष्ट आहे. या IPO मध्ये 1250 कोटी रुपयांचे नवीन इक्विटी शेअर्स जारी केले जातील आणि प्रमोटर BCP Asia II TopCo Pte Ltd मार्फत 2750 कोटी रुपयांचे ऑफर फॉर सेल असेल. तसेच अवांसे फायनान्शियल सर्व्हिसेसचे 3500 कोटी रुपये असून , या IPO अंतर्गत 1000 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी होतील आणि त्याचसोबत 2500 कोटी रुपयांचा ऑफर फॉर सेल असेल. याशिवाय सुरक्षा डायग्नॉस्टिक, ममता मशीनरी, ट्रान्सरेल लाइटिंग यांसारख्या कंपन्याही डिसेंबरमध्ये आपले IPO आणण्याच्या तयारीत आहेत.

निवडणुकीच्या निकालामुळे सकारात्मक वातावरण

2024 हे वर्ष IPO साठी यशस्वी ठरत आहे. ट्रेडजिनीचे COO त्रिवेश डी यांच्या मते , महाराष्ट्र निवडणुकीच्या निकालांमुळे बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे IPO संदर्भातील हालचालींना गती मिळाली आहे. कंपन्या विस्तार योजनांसाठी निधी उभारणे, कर्ज फेडणे आणि कार्यकारी भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठी प्राथमिक बाजारपेठेचा लाभ घेत आहेत. त्यामुळे आगामी महिन्यांत 30 पेक्षा जास्त IPO येण्याची अपेक्षा आहे.