औरंगाबाद | जिल्ह्यात दुसऱ्या लाटेचा संसर्ग वेगात पसरला. त्यानंतर प्रशासनाच्या वतीने योग्य निर्बंध लावून संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. याला नागरिकांनी देखील बऱ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. याचेच यश आता आलेले बघायला मिळत आहे. शहरातील संसर्ग कमी झाला आहे. त्यामुळे १० कोरोना केअर सेंटर तात्पुरते बंद करण्यात आली आहेत.
शहरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढल्याने प्रशासनाने कोवीड केअर सेंटरमध्ये वाढ केली. सुरुवातीला मेल्ट्रॉन, एमआयटी व पदमपुरा या ठिकाणचेच कोवीड केअर सेंटर सुरु होते. मात्र आवश्यकतेनुसार वाढ करीत ही संख्या २१ वर गेली आहे. एप्रिल अखेरच्या सप्ताहापासून रुग्णांची संख्या कमी होत असल्याने काही कोविड केअर सेंटर बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
हि 10 सेंटर असतील बंद
१) शासकीय तंत्रनिकेतन वसतीगृह
२) श्रेयस इंजिनिअरिंग कॉलेज
३) संत तुकाराम वसतीगृह
४) शासकीय विज्ञान संस्थेचे वसतीगृह
५) शासकीय अध्यापक महाविद्यालयाचे ६) मुले आणि मुलींचे वसतीगृह
७) देवगिरी महाविद्यालयातील मुलींचे वसतीगृह
८) विद्यापीठातील छत्रपती वसतीगृह
९) यशवंत वसतीगृह
10) पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालय
या कोविड केअर सेंटरचा बंद करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये समावेश आहे. भविष्यात गरज पडली तर ते सेंटर पुन्हा सुरु केले जातील असे मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगीतले. सध्या ११ कोविड केअर सेंटर सुरु आहेत. त्या ठिकाणी ११९८ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यात पुरुष रुग्णांची संख्या ६८३ तर महिला रुग्णांची संख्या ५०५ आहेत.