जयंत पाटलांनी आधी गरिबांसाठी आलेला तांदूळ कुठे विकला याचा खुलासा करावा – भाजपचे प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | परदेशातून मदतीची विमानेच्या विमाने भारतात येत आहेत, पण ती मदत नेमकी कुठे जाते हे कळत नाही”, असं म्हणत ती मदत नेमकी कुठे जाते, याचा खुलासा केंद्र सरकारने करावा असा खुलासा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला होता त्यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. जयंत पाटलांनी आधी महाराष्ट्रातील गोरगरिबांसाठी आलेला तांदूळ कुठे विकला याचा खुलासा करावा अस आव्हान त्यांनी दिल आहे.

“मदतीची विमानेच्या विमाने येत आहेत, ती नेमकी कुठे जात आहेत याचा खुलासा केंद्राने करावा” म्हणून विचारणाऱ्या जयंत पाटलांनी आधी महाराष्ट्रातील गोरगरिबांसाठी आलेला तांदूळ कुठे विकला आणि कोणी विकला त्याचा खुलासा करावा. परदेशी मदतीचे सुयोग्य वाटप करायला मोदी सरकार समर्थ आहे. असे ट्विट अतुल भातखळकर यांनी केलं

जयंत पाटील नक्की काय म्हणाले होते –

भारतात दर दिवशी परदेशातून मदतीची विमानेच्या विमाने उतरत आहेत. पण ही मदत महाराष्ट्राला तर काही मिळाली नाही. त्यामुळे ही मदत नेमकी कुठे जात आहे, याचा खुलासा केंद्र सरकारने करावा, अशी अपेक्षा जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली होती.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

You might also like