हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपला टक्कर देण्यासाठी उद्धव ठाकरे गटाने जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. अशातच ठाकरे गटाने महाराष्ट्रातील संघटनात्मक बांधणीसाठी विभागीय नेत्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार, ठाकरे गटाच्या 10 प्रमुख नेत्यांवर राज्यातील वेगवेगळ्या विभागांची जबाबदारी सोपवली आहे. उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र ,कोकण, मराठवाडा, पश्चिम आणि पूर्व विदर्भ अशा विभागांसाठी ठाकरे गटाने 10 नेत्यांची नियुक्ती केली आहे.
ठाकरे गटाकडून जबाबदारी सोपविण्यात आलेल्या दहा नेत्यांमध्ये खासदार संजय राऊत, अनिल देसाई, राजन विचारे, अनंत गीते, आमदार रवींद्र वायकर चंद्रकांत खैरे, सुनील प्रभू, भास्कर जाधव, विनायक राऊत यांचा समावेश आहे. या सर्व नेत्यांवर महाराष्ट्रातील पक्ष बांधणीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यातून हे स्पष्ट होते की ठाकरे गट आगामी निवडणुकांसाठी जोमाने कामाला लागला आहे.
कोणत्या नेत्यांवर कोणती जबाबदारी
संजय राऊत – संजय राऊत यांच्याकडे लोकसभा मतदारसंघ नाशिक, दिंडोरी, जळगाव, रावेर, धुळे, नंदुरबार, नगर, शिर्डी, पुणे, बारामती, शिरूर, मावळ या विभागांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
अनंत गीते – कोकण, रायगड, मावळ, पनवेल, कर्जत, उरण या विभागांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
चंद्रकांत खैरे – आगामी निवडणुकांसाठी मराठवाडा, संभाजीनगर, जालना, या विभागांसाठी खैरे जबाबदारी पार पाडणार आहेत.
सुनील प्रभू – सोलापूर धाराशीव, लातूर, बीड मतदार संघामध्ये संघटन बांधणीसाठी सुनील प्रभू काम करतील.
अरविंद सावंत – बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ – वाशिम, वर्धा येथील मतदार संघात पक्ष बांधण्यासाठी अरविंद सावंत काम करतील.
अनिल देसाई – सातारा, माढा, सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी येथील विभागामध्ये अनिल देसाई आपली जबाबदारी पार पाडतील.
राजन विचारे – ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर लोकसभा या मतदारसंघांमध्ये विचारे संघटन बांधणी करतील.
भास्कर जाधव – यांच्यावर नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली-चिमूर मतदार संघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
रवींद्र वायकर – नांदेड, हिंगोली, परभणी लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी वायकर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
विनायक राऊत – रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात विनायक राऊत आपली जबाबदारी पार पाडतील.