हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पंतप्रधान नरेंद्र मोदी मालदीवला भेट देऊन आल्यापासून भारतात एक नवा वाद निर्माण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी मालदीवच्या तीन मंत्र्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. या वक्तव्यावरूनच हा वाद निर्माण झाला आहे. मुख्य म्हणजे, आता भारताशी वाद घालणे मालदीवला चांगलेच भोवले आहे. सध्या या वादातून सोशल मीडिया ते ऑनलाइन बुकिंग प्लॅटफॉर्म पर्यंत सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.
सध्या सोशल मीडियावर दावा करण्यात येत आहे की, मालदीवच्या मंत्र्यांनी नरेंद्र मोदींविषयी आक्षेपार्ह वक्तव्यं केल्यापासून आतापर्यंत 10,500 हॉटेल बुकिंग आणि 5,520 विमानाची तिकीट रद्द करण्यात आली आहेत. ही आकडेवारी मालदीवच्या पर्यटन उद्योगाला मोठा धक्का देणारी आहे. त्यामुळे आता पर्यटनाला पुन्हा चालला देण्यासाठी मालदीव भारताची माफी मागेल का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मुख्य म्हणजे, भारत आणि मालदीवमध्ये निर्माण झालेल्या वादामुळे भारतीय पर्यटकांनी देखील मालदीवविषयी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, “आता आपल्याला मालदीवला जाण्याचा रस राहिलेला नाही” अशा देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत. थोडक्यात, मंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे मालदीव पर्यटन उद्योगाला मोठा धक्का बसला आहे. मालदीवची अर्थव्यवस्था पूर्णपणे पर्यटनावर अवलंबून असताना असा धक्का बसणे मालदीवला तोट्यात आणू शकते.