हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | येत्या 22 जानेवारीला राम मंदिराचे उद्धघाटन होणार असून रामललाच्या दर्शनासाठी सर्व भाविक आतुर आहेत. भाविकांना दर्शनासाठी हे मंदिर 24 जानेवारीला खुले करण्यात येणार आहे. संपूर्ण भारतात या सोहळ्यासाठी भाविक येणार असून त्यांच्या सोयीसुविधेचा विचार करत उत्तर प्रदेश सरकारने रामपथ आणि धर्मपथावर ईलेक्ट्रीक बस सेवा सुरु करण्याची योजना आखली आहे.
एकूण 100 इलेक्ट्रिक बसेस सोडल्या जाणार
अयोध्येला जाण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत. तसेच अनेक वर्षांची ही प्रतीक्षा अखेर संपणार असल्यामुळे देशातून लाखो भाविक येणार आहेत. त्यामुळे गर्दी ही प्रचंड होणार आहे. याचाच विचार करून उत्तर प्रदेश सरकारकडून 15 जानेवारी पासून एकूण 100 इलेक्ट्रिक गाड्या प्रवाशांसाठी सोडल्या जाणार आहेत. पर्यावरणाचा विचार करत सोडल्या जाणार इलेक्ट्रिक बस आयोध्येला जाण्यासाठी लाखो भाविकांची गर्दी तसेच पर्यावरणाचा विचार करत, पर्यावरणाला पूरक असे वातावरण देण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने इलेक्ट्रिक गाड्या सुरु करण्यात आल्या आहेत.
ई – रिक्षा देखील सुरु केल्या
राम मंदिराच्या उद्धघटनामुळे होणारी गर्दी आणि प्रदूषण याचा विचार करत पर्यावरण पूरक गोष्टी अवलंबवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामध्ये अयोध्येत मंदिर परिसरात गोल्फ कार्ट आणि ई-रिक्षा सुद्धा सुरु केल्या जाणार आहेत. यामुळे होणारे प्रदूषण काही प्रमाणात रोखता येऊ शकते. अशी आशा आहे. तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महर्षि वाल्मीकि आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आणि अयोध्याधाम रेल्वे स्थानकाचे उद्घाटन केले आहे. राम मंदिराचा सोहळा आता नेमका कसा पार पडणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
आयोध्येत सरकारची जय्यत तयारी सुरु
उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या राम मंदिराच्या सोहळ्यासाठी सरकार तसेच प्रशासनाची जय्यत तयारी सुरु आहे. भाविकांच्या होणाऱ्या गर्दीसाठी अधिकच्या गाड्या सोडण्यात तर आल्याचं आहेत. त्याचबरोबर कॉरिडॉर बांधण्यात आले आहे. त्याचप्रमाणे पार्किंग पॉईंटही तयार करण्यात आले आहेत. त्यासाठी साकेत पेट्रोल पंप ते लता मंगेशकर चौकापर्यंत सर्व ठिकाणी कच्चा पार्किंग आणि पक्की पार्किंगची ठिकाणे विकसित करत आहेत. यामुळे पार्किंगची एनवेळेला होणारी अडचण दूर होऊ शकते. त्यासाठीच हे पाऊल उचलण्यात आले आहे.