कोयना धरणातून सांगली जिल्ह्यासाठी १ हजार क्युसेस पाणी सोडण्यात येणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणातून सांगली जिल्ह्यासाठी अतिरिक्त १ हजार क्युसेस पाणी सोडण्यात येणार आहे. सांगली जिल्ह्यातील महत्वकांक्षी असलेल्या टेंभू- म्हैसाळ योजनेसाठी पाण्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे सांगली पाटबंधारे विभागाने पाण सोडण्याची मागणी केली आहे.

राज्यात उन्हाची तिव्रता वाढलेली असून पाणीसाठा कमी होवू लागला आहे. सांगली जिल्ह्यातही टेंभू- म्हैसाळ पाणी योजनेत पाण्याचा तुटवडा पडू लागला आहे. या योजनेवर मोठ्या प्रमाणावर शेती असल्याने कोयना धरणातून पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली आहे. सध्या कोयना धरणातून २१०० क्युसेस पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. धरणातील पाणीसाठा मुबलक व सुरक्षित असल्याची माहिती कोयना धरण व्यवस्थापनाने दिली आहे.

सांगली जिल्ह्यासाठी कोयना धरणातुन अतिरिक्त १००० क्युसेस पाणी विसर्ग वाढविला जाणार आहे. त्यांचा फायदा सांगली जिल्ह्यातील महत्वकांक्षी टेंभू – म्हैसाळ योजनेला होणार आहे. कोयना धरणातून सलग १० दिवस पाणीपुरवठा चालू ठेवण्याचा निर्णय कोयनाधरण व्यवस्थापनाने घेतलेला आहे. त्यामुळे सध्या २१०० क्युसेस पाणी विसर्ग सुरू असून अतिरिक्त १००० क्युसेस विसर्ग वाढविल्याने ३ हजार १०० क्युसेस पाणी विसर्ग होणार असल्याची माहीती व्यवस्थापनाने दिली आहे.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group