राज्यात आरोग्य विभागात 10 हजार पदे भरणार ः अब्दुल सत्तार

ग्रामविकास विभागचा जिल्हा परिषदा अंतर्गत मेघा भरती करण्याचा निर्णय

औरंगाबाद | कोरोनाच्या महामारीच्या काळात दवाखान्यातील रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. राज्यात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या अंतर्गत मेघा भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वित्त विभागाची परवानगी घेतल्यानंतर 10 हजार पदे तातडीने भरण्यात येतील अशी माहीती ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे.

राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, जिल्हा परिषदेच्या अतंर्गत आरोग्य सेवक, सेविका, प्रयोगशाळा तज्ञ, आैषधनिर्माता व आरोग्य परिवेक्षक अशाच पध्दतीने अनेक पदे भरण्यात येणार आहेत. महाराष्ट्रात जी पदे रिक्त आहेत, त्यांची फाईल मंत्री महोदय यांच्याकडे फाईल जाईल. वित्त विभागाची परवानगी मिळाल्यानंतर तातडीने ही पदे भरली जातील. जवळपास 10 हजार 127 पदांच्या भरतीसाठी मिळाली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच जिल्ह्यांच्या जिल्हा परिषद आरोग्य विभागात होणार भरती करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाचा निर्णय झाला आहे. त्यामुळे सध्याच्या वैद्यकीय आरोग्य यंत्रणेवर असलेला ताण कमी होण्यास तसेच लोकांना आरोग्य सेवा मिळण्यास फायदा होणार आहे.

You might also like