10 वी – 12 वीच्या परीक्षा ऑफलाइन होणार; पहा परीक्षांचा कालावधी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील 10 वी – 12 वीच्या परीक्षा ऑफलाइन होणार असल्याची महत्त्वपुर्ण माहिती बोर्डाने दिली आहे. तसेच विद्यार्थी शिकत असलेल्या शाळेतच परीक्षा केंद्र असणार आहेत. बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी याबाबत आज पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या ही 31 लाख आहे. तांत्रिक पद्धतीने ही परीक्षा घेणं शक्य नाही, त्यामुळे परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने घेणं शक्य नाही, असं शरद गोसावी म्हणाले.

10 वीच्या परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल पर्यंत होतील तर 12 वीच्या लेखी परीक्षा 4 मार्च ते 30 मार्च पर्यंत होतील. 14 फेब्रुवारी ते 4 मार्च पर्यंत तोंडी परीक्षा होणार आहेत. परिक्षा हॉलमधे जास्तीत जास्त 25 विद्यार्थी एक सोडून एक या पद्धतीने बसवण्यात येतील. यावेळेस प्रॅक्टिकल परीक्षेसाठी शाळेबाहेरचे शिक्षक बहिस्थ परीक्षक म्हणून नसतील तर, त्याच शाळेतील शिक्षक अंत्यस्थ आणि बहिस्थ परीक्षक म्हणून काम करतील.प्रत्येक केंद्रावर वैद्यकीय सुविधा असतील असेही बोर्डाने सांगितलं.

विद्यार्थ्यांना 10 मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका देण्यात येणार आहेत. यावर्षी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परिक्षा देण्यासाठी वाढीव वेळ मिळणार आहे. 40 ते 60 गुणांसाठी 15 मिनिटे अतिरिक्त वेळ मिळेल तर 70 ते 100 मिनिटे पेपर साठी अर्धा तास अतिरिक्त वेळ विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

Leave a Comment