पुणे हादरलं ! वर्गात घुसून आरोपीकडून 10 वीच्या विद्यार्थिनीवर चाकूनं सपासप वार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये भरदिवसा एका माथेफिरू आरोपीने दहावीतल्या विद्यार्थिनीवर चाकूने हल्ला केला आहे. विशेष म्हणजे वडगाव शेरी येथील एका शाळेत घुसून या आरोपी माथेफिरूने या तरुणीवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात हि तरुणी गंभीर जखमी झाली आहे. सध्या या पीडित मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे शाळेच्या परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
हि घटना घडली तेव्हा सकाळी 11 वाजता इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ सुरू होता. यादरम्यान आरोपी तरुण हातात चाकू घेऊन विद्यार्थिनीच्या दहावीच्या वर्गात घुसला. यावेळी आरोपीने इतर विद्यार्थ्यांच्या समोर आणि शिक्षिकेच्या समोरच या मुलीवर सपासप वार केले. यामुळे तिकडे भीतीचे वातावरण निर्माण झाले. यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या विद्यार्थिनीला एका पालकांच्या मदतीने तातडीने वडगाव शेरी येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

हा हल्ला केल्यानंतर आरोपी तरुण घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा हल्ला एकतर्फी प्रेमातून करण्यात आला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे. या जखमी मुलीवर सिटी हॉस्पिटल वडगाव शेरी याठिकाणी उपचार सुरू आहेत. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

Leave a Comment