हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात मुसळधार पावसामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात महापूर आला तसेच काही ठिकाणी दरड कोसळून जीवितहानी झाली आहे. पूरपरिस्थितीचा मोठा फटका राज्यातील नागरिकांना बसला असून सरकारकडून मदत मिळणार का अशी अशा व्यक्त करण्यात होत होती. याच पार्श्वभूमीवर राज्यातील ठाकरे सरकारने जनतेला मोठा दिलासा दिला आहे. राज्य सरकार कडून पूरग्रस्तांना 11500 कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे
दुकानदारांसाठी 50 हजार तर टपरी वाल्यान 15 हजार रुपये जाहीर करण्यात आले असून उद्यापासून हे वाटप जाहीर होईल असं मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले तर पूर्ण घर पडलेल्याना दिड लाख रुपये जाहीर करण्यात आले आहे. घराचे किरकोळ नुकसान झालं असेल तरी 50 हजार रुपये मदत केली जाणार आहे.
नुकत्याच झालेल्या अतीवृष्टीमुळे राज्यात पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी तातडीची मदत तसेच दुरुस्ती व इतर दीर्घकालीन उपायांसाठी ११ हजार ५०० कोटी रुपये खर्चास आज मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 3, 2021
ही रक्कम रोख स्वरूपात मिळणार नसून धनादेशाद्वारे मिळणार आहे असेही विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. तसेच प्रत्येक कुटुंबाला 10 हजारांची सानुग्रही मदत केली जाणार आहे